अंबरनाथ मध्ये १ लाख ३० हजार रुपयाचा अमली पदार्थ जप्त
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
अंबरनाथ : अंबरनाथ येथील भगतसिंग नगर मध्ये उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाने छापा मारत १ लाख ३० हजार रुपयाचा अमली पदार्थ जप्त करुन एका इसमाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी अंबरनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे .
अंबरनाथ येथील भगतसिंग नगर मध्ये एक इसम गांजा चरस हा अमली पदार्थ घेवुन येणार असल्याची माहीती उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाचे ए एस आय बांडे यांना मिळाली.तेव्हा त्या अनुषंगाने वरिष्ठांच्या परवानगीने वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक कोळी व अधिकारी , अंमलदार व पंच असे मिळुन त्या परिसरात सापळा लावून एक इसम त्या ठिकाणी मिळुन आला असुन अल्लाबक्ष गुगूडवली शेख वय ५४ असे त्याचे नाव आहे. तो भगतसिंगनगर, बडोदा बँक पाठीमागे झोपडपट्टी, रेल्वे स्टेशन जवळ अंबरनाथ प.येथे राहणारा असून त्याची झडती घेतली असता त्याचे कडे १ लाख ३० हजार रुपये किमंतीचा अमली पदार्थ मिळाला असुन त्या मध्ये ९० हजार रुपये किमंतीचा १ किलो ४२० ग्रॅम वजनाचा गांजा आणि ४० हजार रुपये किमंतीचा
२५ ग्रॅम वजनाचा चरस मिळून आला आहे.दरम्यान पोलिसानी जागीच सापळा पंचनामा करून सदर मुद्देमाल जप्त केला असुन त्या इसमाविरूध्द
अंबरनाथ पोलीस ठाण्या मध्ये एन.डी.पी.एस. कायदा कलम ८ (c), 20(b), (ii) (B),21 (a)प्रमाणे फिर्याद देऊन गुन्हा दाखल केला आहे त्या इसमाला पोलिसानी अटक केली आहे. भगतसिंग नगर मध्ये शबाना शेख ही महिला गांजा माफिया असुन तिला तिच्याच देखरेखीत हे अमली पदार्थाचे धंदे चालत आहेत . या अमली पदार्थाच्या विक्री विरुध्द समाजसेवक प्रविण गोसावी यांनी मोहिम सुरु केली आहे . शहरात कुठे ही अमली पदार्थाचे धंदे आढळुन आल्यास गोसावी हे त्यांच्या विरुध्द तक्रारी करुन या धंद्यांचा भांडाफोड करण्याचा प्रयत्न करत आहेत.


