मातोश्री शेवंताबाई गजानन पाटील अटाळी विद्यालयाचा 100 टक्के निकाल
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण : अटाळीतील मातोश्री शेवंताबाई गजानन पाटील माध्यमिक विद्यालयाचा यंदाही 100 टक्के एसएससी निकाल लागला असल्याने गेल्या नऊ वर्षांपासून 100 टक्के एसएससी निकालाची पंरपरा कायम ठेवली आहे. एस.एस.सी निकाल 2024 -25 मध्ये शाळेचे मराठी माध्यामाचे विद्यार्थी 1) संकेत सोमनाथ भांगरे – 91.20% 2) श्रावणी संतोष मांडवे 90.40%, 3) वेदांत युवराज पवार 90.20% मिळवित अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.
तर शाळेच्या इंग्रजी माध्यामाचे विद्यार्थी अनुक्रमे 1) नुपूर गणेश पाटील 90.20टक्के, मयूर सचिन सोनवलकर 89.00 टक्के, साहिश संतोष कांबळे 88.00टक्के गुण मिळाले असून अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. इंग्रजी, मराठी माध्यामाचे सन 2024-25 एसएससी शालांत परिक्षेला बसलेले शाळेचे सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने यंदाही शाळेने १०० टक्के निकालाची पंरपरा कायम ठेवली असल्याचे शाळाचे मुख्याध्यापक गणेश पाटील यांनी माहिती दिली.

