Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

कल्याण तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदाची आरक्षण सोडत पडली पार


कल्याण तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदाची  आरक्षण सोडत पडली पार

कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,

मुंबईग्रामपंचायत सरपंच उपसरपंच निवडणूक नियम १९६४ मधील तरतुदी नुसार माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वय कल्याण तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत १३ मे २०२५ रोजी ३.३० वा.दरम्यान आचार्य अत्रे नाट्यगृह येथे उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर यांच्या नियंत्रणाखाली पार पडली असून,काढत प्रक्रिया तहसीलदार सचिन शेजुळ यांच्या मार्गदर्शनाखाली, नायब  तहसीलदार अभिजित  चव्हाण यांच्या उपस्थितीत चिट्टी पद्धतीने पार पडली. यावेळी एकूण ४१ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षण निश्चित करण्यात आले. त्यामध्ये ३ अनुसूचित जमातीसाठी ,३ अनुसूचित जातीसाठी, नागरिकांच्या मागासवर्गीय प्रवर्गासाठी ११ आणि खुल्या प्रवर्गासाठी २४ ग्रामपंचायत आरक्षित करण्यात आल्या. महिलांना ५०% टक्के आरक्षण देण्यात आले असून, त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी १, अनुसूचित जमातीसाठी २, मागासवर्गीय प्रवर्गासाठी ५ आणि खुल्या प्रवर्गासाठी १२ जागा महिलांन उमेदवारासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. आरक्षण प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाच्या आळीपाळी धोरणानुसार पार पडली. मागील तीन पंचवार्षिक कालखंड म्हणजे २०१०,२०१५ आणि २०२० मधील आरक्षण क्रम लक्षात घेऊन या वेळेचे आरक्षण निश्चित करण्यात आले.  यामध्ये ज्या ग्रामपंचायतींना या आदी आरक्षण मिळाले नव्हते, त्यांना यावेळी प्राधान्य देण्यात आले. लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसूचित जाती, जमाती व मागासवर्गीय प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित करण्यात आले असून, महिलांचे आरक्षणही त्याच पद्धतीने समाविष्ट केले गेले. चिट्टी टाकण्याच्या प्रक्रियेत काही विशिष्ट ग्रामपंचायत मध्ये मागील आरक्षणाचे विचार करून आरक्षण निश्चित करण्यात आले. ही सोडत पारदर्शक पद्धतीने व नियमानुसार पार पडल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले. या चिट्टी मार्फत आरक्षण सोडत प्रकियेत आणे भोसोळ - अनुसूचित जाती स्त्री ,वासुंद्री - अनुसूचित जाती स्त्री,कांबा - अनुसुचित जाती,जांभूळ मोहिली - अनुसुचित जमाती स्त्री,काकडपाडा - अनुसूचित जमाती स्त्री, वाहोली - अनुसूचित जमाती,दहिवडी - ना. मा.प्र.स्त्री (ओबीसी), गोवेली रेवती - ना.मां.प्र.स्त्री (ओबीसी),निंबवली मोस - ना.मां.प्र.स्त्री(ओबीसी),उशिद आराळे - ना.मां.प्र.स्त्री(ओबीसी),वरप - ना.मां.प्र.स्त्री(ओबीसी),चवरे - ना.मां.प्र.(ओबीसी),दहागाव - ना.मां.प्र.(ओबीसी), केळली कोलम - ना.मां.प्र.(ओबीसी),म्हसकळ अनखर - ना.मां.प्र.(ओबीसी),रुंदे आंबिवली - ना.मां.प्र.(ओबीसी),वसत शेलवली - ना.मां.प्र.(ओबीसी),आपटी मांजार्लि - सर्वसाधारण स्त्री , गेरसे - सर्वसाधारण स्त्री, गुरवली - सर्वसाधारण स्त्री,घोटसई - सर्वसाधारण स्त्री, कोसले - सर्वसाधारण स्त्री,मामनोली - सर्वसाधारण स्त्री,म्हारळ - सर्वसाधारण स्त्री, नडगाव दानबाव - सर्वसाधारण स्त्री, नांदप - सर्वसाधारण स्त्री,राया ओझर्ली - सर्वसाधारण स्त्री,रायता पिंपळोली - सर्वसाधारण स्त्री, वेहळे - सर्वसाधारण स्त्री,बापसई - सर्वसाधारण, बेहरे - सर्वसाधारण,फळेगाव - सर्वसाधारण, कुंदे - सर्वसाधारण, खोणी वडवली - सर्वसाधारण, मानीवली - सर्वसाधारण,पळसोली - सर्वसाधारण, पोई - सर्वसाधारण,रोहण अंताडे - सर्वसाधारण, सांगोडे - सर्वसाधारण, उतणे चिंचवली - सर्वसाधारण,वडवली शिरढोण - सर्वसाधारण आरक्षण सोडत २०२५ -  २०३० या कालावधी मधील  मुदतीनुसार होणाऱ्या ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी  निश्चित करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.