उल्हासनगर येथे 94 निरंकारी भक्तांचे उत्स्फूर्त रक्तदान
कलम भूमि, कल्याण प्रतिनिधि,
कल्याण : सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांची शिकवणूक जीवनात उतरवत मानवीयतेचा आदर्श समोर ठेवत संत निरंकारी सत्संग भवन, गोल मैदान, उल्हासनगर येथे रविवारी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 94 निरंकारी भक्तांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. संत निरंकारी रक्तपेढी, विलेपार्ले, मुंबई मार्फत या शिबिरामध्ये रक्त संकलन करण्यात आले.
संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिरामध्ये संत निरंकारी मिशनच्या उल्हासनगर तसेच आजुबाजूच्या शाखांमधील 117 भाविक भक्तगणांनी रक्तदानासाठी आपली नाव नोंदणी केली होती. यावरुन त्यांच्या मानवसेवेच्या उदात्त भावनेची प्रचिती येते.
मिशनचे स्थानिक सेक्टर संयोजक आणि सेवादल अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये निरंकार ईश्वराच्या प्रति प्रार्थना करत सतगुरुंच्या जयघोषा द्वारे या शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.
हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी स्थानिक सेक्टर संयोजक किशन नेनवाणी आणि क्षेत्रीय संचालक जनार्दन म्हात्रे यांच्या देखरेखीखाली सेवादल स्वयंसेवक व संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी महत्वपूर्ण योगदान दिले.
-

