कल्याण मधील मदरसाच्या अनधिकृत वाढीव बांधकामावर केडीएमसीचा हातोडा
कलम भूमि, कल्याण प्रतिनिधि,
कल्याण : कल्याण पश्चिमेकडील रहेजा परिसरात सत्यम इमारतीमध्ये मदरशामध्ये अनधिकृत वाढीव बांधकाम झाल्याची तक्रार एका महिला डॉक्टरने केली होती. या तक्रारीची दखल घेत रविवारी केडीएमसीने पोलीस बंदोबस्तात मदरसाच्या अनधिकृत वाढीव बांधकामावर हातोडा चालवत जमीनदोस्त केले.
कल्याण रहेजा कॉम्प्लेक्स मध्ये मदरसामध्ये अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. एका रहिवाशी इमारतीच्या तळमजल्यावर मदरसाचे वाढीव अनधिकृत बाधंकाम इमारतीच्या मूळ बांधकामात बदल करून वाढीव अनाधिकृत बांधकाम करण्यात आले होते. कल्याण डोंबिवली महापालिकेकडे या संदर्भात तक्रार प्राप्त झाली होती. तक्रारीनंतर ,सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात यांच्या पथकाने कारवाई चा बडगा उगारित मदरसाचे अनाधिकृत वाढीव बांधकामावर तोडक कारवाई केली.

