बुद्ध जंयती निमित्त आयोजित आरोग्य शिबीर संपन्न
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण: कल्याण पूर्व येथील आर.के.टी शाळेजवळील रत्नसागर बुद्ध विहार समोर एकदिवसीय आरोग्य शिबीर पार पडले. कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक सम्यक विद्यार्थी आंदोलन राज्य प्रवक्ते रुपेश हुंबरे हे होते. या आरोग्य शिबीराच्या माध्यमातून विभागातील शेकडो नागरिकांनी तपासणी करून घेतली. बुद्ध पोर्णिमेनिमित्त नागरिकांना खिरदान सुध्दा करण्यात आले.
यावेळी प्रामुख्याने कोसवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश न्हांयिदे व वंचित चे महिला आघाडी चे माया कांबळे, रेखा कुरवारे, अँड रजनी आगळे, शितल तांबे, निलम तांबे व युवा आघाडीचे प्रकाश घोंगडे , अजिंक्य वाघमारे , वंचित चे माजी पदाधिकारी गणेश शिंदे, सन्नी केदार, प्रफुल्ल साळवे ,सामाजिक कार्यकर्ते राहुल हुंबरे, अँड प्रशांत जाधव,डि.एम.गायकवाड, बौध्दाचार्य देवानंद कांबळे ,अशोक हुंबरे, गणेश साळवे, योगेश हुंबरे, तसेच सम्यक विद्यार्थी आंदोलन ठाणे जिल्हा महासचिव राजु खरात इतर पदाधिकारी उपस्थित होते. शिबिराच्या वेळी काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यांमध्ये मरण पावलेल्या पिडिताना श्रद्धांजली वाहण्यात आली.


