Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

जपान तंत्रज्ञानाचे क्रशर मशीन गिरीराज कन्ट्रक्शन कंपनीच्या ताफ्यात

 


जपान तंत्रज्ञानाचे क्रशर मशीन गिरीराज कन्ट्रक्शन कंपनीच्या ताफ्यात

कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,

धोकादायक इमारती, अनधिकृत बांधकाम 12 व्या मजल्यापर्यंत करता येईल कारवाई*या

कल्याण : जपान तंत्रज्ञानाचे हाय जॉ क्रशर मशीन गिरीराज कंट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या ताफ्यात दाखल झाले असून महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून या भव्य मशीनचे उद्घाटन नितीन चव्हाण यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यावेळी कंपनीचे संपूर्ण कामगार उपस्थित होते.

जपान ते भारत असा अनेक मैलाचा प्रवास करून प्रथम चेन्नई येथे त्याचे सुटे भाग एकत्र जोडण्यात आले त्यानंतर महाराष्ट्रातील  ठाणे जिल्ह्यात अतिशय अवाढव्य असे मशीन आणण्यात आले आहे. त्यानंतर त्याच्या राहिलेल्या संपूर्ण भागांची जोडणी गोवेली येथे पूर्ण करण्यात आली.
आपल्या नव नवीन तंत्रज्ञानाने जगाला आश्चर्यचकित करणाऱ्या तंत्रज्ञानामध्ये अव्वल असणाऱ्या जपानने सर्वच क्षेत्रात भरीव कामगिरी करून अनेक मशीन हत्यारे अवजारे तयार केले आहेत. ज्या कामाला जास्त मनुष्यबळ तसेच जास्त कालावधी लागतो ते काम अगदी कमी वेळात होते वेळ आणि श्रम वाचत असल्याने या मशीनला महत्व निर्माण झाले होते.

हाय जॉ क्रशर मशीन हे जपान मधील कोबेल्को कंपनीचे मशीन असून 350 (एचपी)त्याची इंजिन क्षमता आहे.
या मशीनच्या साह्याने बाराव्या मजल्यापर्यंत सहज पोहोचता येते धोकादायक इमारती जुन्या पाण्याच्या टाक्या मोडकळीस व धोकादायक इमारती बारा मजल्यापर्यंत तयार झालेल्या अनधिकृत इमारती या मशीनच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात येतात.

गिरीराज कंट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका, पनवेल महानगरपालिका या  हद्दीतील  गिरीराज कंट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड हे अधिकृत ठेकेदार म्हणून काम करीत आहेत. या कंपनीच्या माध्यमातून उल्हासनगर, कल्याण, पनवेल या महानगरपालिका हद्दीतील धोकादायक इमारती अनधिकृत बांधकामे जुन्या पाण्याच्या टाक्या काही क्षणातच जमीन दोस्त करण्यात येतात. तसेच ही मशीन हाताळताना अतिशय काळजी घेतली जात असून चालकाच्या दृष्टीने सर्व त्या उपाययोजना केलेल्या आहेत. या मशीनच्या सहाय्याने दिवस-रात्र बाराव्या मजल्यापर्यंत 35 मीटर पर्यंत काम करता येते तसेच या मशीनला चार कॅमेरे व चालकाला बसण्यासाठी 40 डिग्री फिरणारे कॅबिन जोडले आहे. 


कल्याण डोंबिवली महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका, पनवेल महानगरपालिका मध्ये या अगोदरही सात मजल्यापर्यंत कामे होत होती. परंतु या मशीनच्या सहाय्याने आता बाराव्या मजल्यापर्यंत काम करता येणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.