आम्ही नगरकर व स्फूर्ती फाउंडेशनच्या मागणीला यश
कलम भूमी , कल्याण प्रतिनिधी,:
कल्याण माळशेज घाट आळेफाटा राष्ट्रीय महामार्ग वरील पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती. हा राष्ट्रीय महामार्ग आहे कि नाही अशी स्थिती होती. या रस्ता दूरूस्ती साठी १ मे रोजी रास्ता रोको करून आंदोलनाचा इशारा आम्ही नगरकर व स्फूर्ती फाउंडेशन वतीने दिल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने विभाग खडबडून जागे झाले व प्रथम खड्डे दूरूस्ती व नंतर प्रत्यक्ष माळशेज घाटातील संपूर्ण रस्ता डांबरीकरण शुभारंभ करण्यात आला.
रस्ता डांबरीकरण शुभारंभाला मुरबाड आमदार किसन कथोरे उपस्थित होते. यावेळी स्फूर्ती फाउंडेशन महिला प्रमुख शिल्पा तांगडकर यांनी त्यांचे औक्षण करत स्वागत केले. तसेच आम्ही नगरकर प्रतिष्ठान व स्फूर्ती फाउंडेशन वतीने कार्याध्यक्ष बजरंग तांगडकर, जेष्ठ पत्रकार शिवचरित्र व्याख्याते शांताराम तांगडकर, संचालक शांताराम झावरे, संस्थेच्या वतीने पुणेकर -नगरकर टोपी परिधान करून, फटाके फोडत, पेढे वाटत आनंद साजरा करत आम्ही नगरकर व स्फूर्ती फाउंडेशन वतीने आभार मानण्यात आले.


