अजुनी उणा, प्रभू, मी’ भजन संध्या संपन्न
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून रेव्ह. नारायण टिळक यांच्या सुमधुर भजनाचा कार्यक्रम कल्याण पश्चिमेकडील रामबाग परिसरात असलेल्या गॉस्पल व्हिजन चर्च येथे सायंकाळी संपन्न झाला.
भजनकार संगीता गोडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘पुष्कळ अजुनी उणा, प्रभू, मी’ या सारखी विविध मराठी ख्रिस्ती भजन सादर करत उपस्थितांकडून दाद मिळवली. यावेळी, माजी नगरसेवक राजू खेमा, माजी केडीएमसी सहाय्यक आयुक्त दिनेच वाघचौरे उपस्थित होते. या भजनसंध्याचे आयोजन विशाल दामले, मोनिका दामले आणि निस्सी दामले यांनी केले होते. तर या कार्यक्रमासाठी आशिष मोरे, संदिप कांबळे, यश मोरे, सोहन, प्रविण गुंजाळ आदींचे विशेष सहकार्य लाभले.

