केडीएमसीच्या आय प्रभागातील अनधिकृत खोल्याचे बांधकाम, जोत्यांवर तोडक कारवाई
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या निर्देशानुसार व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे उपायुक्त अवधुत तावडे यांच्या उपस्थितीत आय प्रभागाचे सहा.आयुक्त भारत पवार यांनी रविवारी कार्यालयीन सुट्टीच्या दिवशी वसार येथील ३२ खोल्यांचे बांधकाम आणि ८ जोते यावर निष्कासनाची कारवाई केली त्याचप्रमाणे नांदिवली येथील ८ खोल्यांच्या बांधकामांवर आणि ७ जोत्यांवर निष्कासनाची कारवाई केली.
हि कारवाई प्रभागातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने आणि 2 जेसीबीच्या सहाय्याने करण्यात आली. प्रशासनाच्या अनाधिकृत बांधकामवर तोडक कारवाई च्या बडग्यामुळे भुमाफिया,अनाधिकृत बांधकाम करणार्या चे चे धाबे दणाणले असल्याचे चित्र दिसून येत आहे.
