राष्ट्रवादी काँग्रेस व लक्ष्य फाउंडेशन यांच्या संयुक्त विदमाने महारोजगार मेळाव्याच्या आयोजन - १०० पेक्षा अधिक कंपन्यातर्फे हजारो युवकांना संधी
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण पूर्व येथे राष्ट्रवादी काँग्रेस, लक्ष फाउंडेशन, कल्पवृक्ष आणि इक्विटॉक्स यांच्या संयुक्त विदमाने आयोजित महा रोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, या महारोजगार मेळाव्याच्या उपक्रमाचे आयोजक राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा अध्यक्ष विक्रांत जगन्नाथ शिंदे यांच्या पुढाकाराने कल्याण पूर्व ,मॉर्डन इंग्लिश स्कूल येथे पार पडलेल्या या भव्य मेळाव्यात १०० हून अधिक नामांतिक कंपन्यांनी भाग घेत हजाराहून अधिक नोकऱ्यांची संधी युवकांना उपलब्ध करून दिल्या.राष्ट्रवादी काँग्रेस कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष जगन्नाथ (आप्पा) शिंदे यांनी यावेळी सांगितले की,येत्या काळात कल्याण पूर्व ,कल्याण पश्चिम,कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली या चार विधानसभा मतदारसंघांमध्ये असे महारोजगार मेळावे आयोजित करण्यात येणार आहे. विशेषत : महिलांसाठी स्वतंत्र रोजगार मेळावाही घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.भविष्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि सोलर एनर्जी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार संधी निर्माण होणार असल्याने युवकांनी केवळ नोकरीपुरतेच मर्यादित न राहता स्वतःचा स्टार्टअप सुरू करून इतरांना रोजगार देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या रोजगार मेळाव्यात आय टी,फिनटेक,मायक्रो फायनान्स, बॅकिंग आणि सर्व्हिसेस क्षेत्रातील प्रतिष्ठित कंपन्यांचा सहभाग होता.
