केडीएमसीच्या "अ" प्रभागात आपत्कालीन टीमने केला पाहणी दौरा पावसाळ्यात पाण्याचा निचारा, चेंबरची झाकणे, होर्डिंग आदी समस्यांचा घेतला आढावा
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण : कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रातील ग्रामीण "अ" प्रभाग क्षेत्रातील टिटवाळा, बल्याणी, मोहने, आंबिवली, अटाळी, मोहेली, ऊभंर्णी, शहाड, परिसराचा केडीएमसीच्या आप्तकालीन टीमने दौरा करीत नाले सफाई कामे, गटारे सफाई आदी कामाची पाहणी केली. जेणेकरून पावसाळ्यात पाण्याचा निचारा व्यवस्थित रित्या होईल आणि संभाव्य पूरपरिस्थिती टाळता येईल. या पाहणी दौर्यात उप आयुक्त संजय जाधव, सहाय्यक आयुक्त अ प्रभागक्षेत्र प्रमोद पाटील, उप अभियंता हरुण इनामदार, अभियंता ओमकार भोईर, आरोग्य निरिक्षक मोनिश गडे आदिसह कर्मचारी वर्गाचा समावेश होता"अ" प्रभागक्षेत्राचा पाहणी दौरा संपूर्ण आपत्कालीन टीम आणि सर्व संबंधित यांचे समवेत केल्याने पावसाळ्यापूर्वी ग्राऊंड रिपोर्ट घेत मुख्य नाले यांची सफाई प्रगतीपथावर असून बल्याणी परिसरात दोन क्रिटिकल ठिकाणे आढळून आली त्यापैकी एका ठिकाणी रविवारी पोकलेन उतरवून काम सुरु केले आहे. बल्याणी येथे बडोदा महामार्गाच्या कामाच्या ठिकाणी पाणी भरण्याची स्थिती होईल त्या अनुषंगाने त्यांच्या ऍथॉरिटी सोबत समन्वय साधला आहे . ते आपल्याला मशिनरी देणार असून रविवारी तात्काळ काम करणार असल्याने पाणी तुबूंणार नाही.


