कल्याणात विक्री साठी ठेवलेल्या आंब्याच्या पेटीत आढळले घोरपडीचे पिल्लू ,
सर्पमित्राने घोरपडीच्या पिल्लाला दिले जीवनदान
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण : कल्याण पश्चिमेतील वायलेनगर परिसरात आंबे विक्रेत्याच्या आंबाच्या पेटीत साप सदुश्य जीव आढळल्याने भितीने विक्रेत्याची धादंल उडाल्याचा धक्कादायक प्रकार के नुकताच घडला.
वायले नगर जवळील निळकंठ पार्क सोसायटीच्या बाजूला एका आंब्या विक्रेत्याच्या पेटीमध्ये साप सुद्श्य जीव आढळल्याने विक्रेताची भितीने धादंल उडाली. या घटने संदर्भात सर्प मित्र दत्ता बोंबे यांना विशाल गायकर याने घोणस साप आहे असं सांगितल्याने तातडीने घटनास्थळी सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी तिथे जाऊन पाहिलं तर आंब्याच्या पेटीतील आंब्याच्या आडोशाला लपलेल्या घोरपडीच्या पिल्ला सुखरूप बाहेर काढले. आणि उपस्थितीतांनी सुटकेचा निश्वास टाकला. सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी जीवनदान दिलेल्या घोरपडीच्या पिल्लास नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

