Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

.एपीएमसी व्यापारी संघटना कल्याण यांची मागणी



कल्याण कृषी उत्पन बाजार समितीच्या अस्तित्वासाठी प्रशासकीय राजवट आवश्यक


कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,

एपीएमसी व्यापारी संघटना कल्याण यांची मागणी
अध्यक्ष प्रशांत माळी यांचे सहकार पणन अधिकारी व मंत्री यांना पत्र 


कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी शेतकरी शेतमालाच्या व्यवसायीकांच्यावतीने अलिकडेच प्रशासकाचे स्वागत केले आहे. सर्वसामान्य नागरिकांना व सर्व मार्केट यार्ड तीन घटकाला प्रशासक नियुक्तीने उत्साह व आनंद वाटतो.  कल्याण कृषी उत्पन बाजार समितीच्या अस्तित्वासाठी प्रशासकीय राजवट आवश्यक असल्याची मागणी एपीएमसी व्यापारी संघटना कल्याण यांनी केली असून याबाबत संघटनेचे अध्यक्ष प्रशांत माळी यांनी सहकार पणन अधिकारी व मंत्री यांना पत्र दिले आहे.



 कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बरखास्त संचालक मंडळाने १६ ते १७ बेकायदेशीर भूखंड वाटप करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करीत करोडोची कमाई केली आहे, व तातपुरता मुदतवाढीच्या कालावधीत कुठलीही शासकीय प्रक्रिया पार न करता करोडो रुपयाची लाच घेऊन केलेली आवश्यक नसलेली नोकर भरती केली आहे. समितीकडे कोणतेही वाहन नसतांना ४ ड्रायव्हर भरले आहेत. तसेच
तातडीने दि.७/ ४/२०२५ रोजी मिटींग घेऊन कुठलीही पारदर्शकता न करता व्यापारी शेतकरी यांच्या वाहनासाठी उपलब्ध असलेल्या जागेवर २० गाळे बोगस वर्तमान पत्रातील जाहीराती द्वारे करोडो रुपयाचा अपहार करून गाळे वाटप केले आहेत.


या सर्व गोष्टींची शासन स्तरावर चौकशी चालू असून त्यावरील लक्ष विचलीत करण्यासाठी विद्यमान
प्रशासका ऐवजी निवडणूकीचा घाट घालण्याचा संधि समितीच्या शेकडो कोटीच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे
दडपणेसाठी प्रशासक हटविणेचा  आग्रह करीत आहेत. तरी व्यापारी वर्गास काही वर्ष तरी बाजार समितीचे
अस्तित्व अबाधीत राहण्यास प्रशासकच रहावा, अशी मागणी शेतकरी व्यापारी व व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत माळी तसेच लक्ष्मी मार्केट व्यापारी संघटनेचे सचिव रामदास यादव यांच्या वतीने मागणी केलेली आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.