पुस्तकांसाठी घर बांधणारे आणि संकल्प भूमि तयार करणारे व्यक्ती म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर,
- उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर,
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण : चैत्यभूमी माहीत होती दीक्षाभूमी माहीत होती पण जेव्हा मी अभ्यास करू लागले तेव्हा संकल्प भूमी ही बाब मला कळाली काय आहे संकल्प भूमी मग मी त्याचा अभ्यास केला तेव्हा सुद्धा एवढ्या काही गोष्टी लक्षात आल्या.त्याचबरोबर पुस्तकासाठी राजगृह घर बांधणारे एकमेव डॉ.बाबासाहेब आंबेडकर हेच आहेत त्याच ठिकाणी त्यांनी भारतीय संविधान लिहिण्याच काम केले. असे प्रतिपादन प्रमुख वक्त्या अंजली धानोरकर उपजिल्हाधिकारी छत्रपती संभाजी नगर यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका बहुजन कर्मचारी परिवर्तन संस्था आयोजित छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने त्या बोलत होत्या.
यावेळी विचार मंचकावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष
उप आयुक्त रमेश मिसाळ, तहसीलदार सचिन शेजाळ, सहा. आयुक्त प्रीती गाडे, माजी महापौर रमेश जाधव, संस्था अध्यक्ष चंद्रकांत पोळ, दत्ता गिरी, जयंती समिती अध्यक्ष संतोष हेरोडे इत्यादीसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सलग दोन दिवस विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात होते. यानिमित्ताने मंगळवारी महापालिका मुख्यालयाच्या आवारात आरोग्य शिबिर चित्रप्रदर्शन संविधान कला दालन मोफत चष्मा वाटप आणि रक्तदान शिबिर अशा विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरामध्ये नेत्र तपासणी रक्तदान शिबिर ब्लडप्रेशर डायबिटीस ची तपासणी करण्यात आली. त्याच बरोबर भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त चित्रप्रदर्शन करून संविधानाविषयी माहिती देण्यात आली. तसेच आचार्य अत्रे रंगमंदिर या ठिकाणी देखील विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाप्रसंगी लोकशाहीर विठ्ठल उमप यांना आंबेडकरी शाहीराचा पुरस्कार देण्यात आला असून संत गाडगे महाराज स्वच्छता कर्मचारी पुरस्कार महापालिका कर्मचारी जाधव यांना देण्यात आला तर आंबेडकर चळवळीतील अधिकारी कर्मचारी पुरस्कार विलास कांबळे यांना संस्थेच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे मानपत्र व रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह देऊन देण्यात गौरविण्यात आले.
सांस्कृतिक कार्यक्रम देशभक्तीपर राष्ट्रीय महापुरुषांच्या जीवन कार्यावर नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आले होते. तसेच प्रबोधनात्मक कार्यक्रम सादरकर्ते शितल भंडारे आणि संच मुंबई यांचा प्रबोधन कला मंच शाहिरी जलसा विवेकी विचारांचा जागर हा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी युवराज गाडे, बाबासाहेब काकडे, डॉ.संदीप पगारे, भाऊराव पंडीत, संजय ओंकारेश्वर, प्रवीण कांबळे, नवनीत गायकवाड, विलास कांबळे, हरिचंद्र जाधव लक्ष्मण मोते, नागेश टोळ, सुनील अंबाडे, भूषण कोकणे, संजीवनी पाटकर, पौर्णिमा कांबळे, अनिता शिंदे, सिमा आठवले, इत्यादींनी परिश्रम घेतले तर सूत्रसंचालन समाधान मोरे यांनी केले तर सर्व उपस्थितांचे विजय सरकटे यांनी आभार मानले.


