कलम भूमी,कल्याण : प्रतिनिधी
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यानंतर, दहशतवाद्यांनी धर्म तपासून नागरिकांवर हल्ला केला. या कृरतेचा उद्देश भारतातील सामाजिक सलोखा बिघडवणे आणि धार्मिक तेढ निर्माण करणे हा स्पष्ट होता. याच पार्श्वभूमीवर ,खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सिएरा लिओन येथून आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून पाकिस्तानला कडक इशारा दिला - " धर्माच्या नावावर होणाऱ्या दहशतवाद आता थांबायलाच हवा".२८ ते ३० मे २०२५ दरम्यान, डॉ. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने सिएरा लिओन दौरा केला. या भेटीचे प्रमुख उद्दिष्ट जागतिक स्तरावर दहशतवादाचा निषेध करणे , जागरूकता निर्माण करणे आणि आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळवणे हे होते. या शिष्टमंडळाने सिएरा लिओनचे उपराष्ट्रपती डॉ.मोहम्मद जुलडेह जल्लोह, संरक्षण उपमंत्री कर्नल (निवृत्त) गुआना ब्रिमा मडकोयी,परराष्ट्रमंत्री ,संसदाध्यक्ष , वीरोधी पक्षाचे नेते यांच्याशी सखोल चर्चा केली. भारताच्या "शून्य सहिष्णुता धोरणाची ठाम मांडणी करण्यात आली आणि सीमापार दहशतवादाला खंतपाणी घालणाऱ्या शक्तीवर कारवाई करण्याचे आवाहन करण्यात आले
. सिएरा लिओनच्या संसदेत पहलगाम हल्ल्याचा तीव्र निषेध करत शोकसभा आयोजित करण्यात आली. तसेच भारतीय समुदाय व स्थानिक प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधत भारत - सिएरा लिओन यामधील दृढ मैत्रीचे महत्व अधोरेखित करण्यात आले. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले की," भारत दहशतवादासंदर्भात कोणतीही तडजोड करणार नाही . आंतरराष्ट्रीय समुदायानेही आता दहशतवादविरुद्ध ठोस आणि एकत्रित पावले उचलण्याची वेळ आली आहे.

