स्मार्ट रस्त्याला झोपडपट्टीचे ग्रहण - वायलेनगर,खडकपाडा परिसरात ब प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्याच्या दुर्लक्षामुळे बकालपणा वाढला; महापालिका आयुक्त अभिनव गोयल कारवाई करतील
कलम भूमी , कल्याण प्रतिनिधी
कल्याण पश्चिमेतील वायलेनगर,खडकपाडा परिसरात स्मार्ट सिटी अंतर्गत वायलेनगर ते सापर्डे पर्यंत अत्याधुनिक स्मार्ट सिटी काम पूर्ण झाले असले तरी, त्याच्या सौंदर्यावर झोपडपट्टीचे ग्रहण लागले आहे. रस्त्याच्या कडेला व्यावसायिक गाळ्याचे तात्पुरते झोपड्या उभारण्यात आल्यामुळे संपूर्ण परिसर बकाल आणि अस्तांवस्त दीसत आहे. या भागात स्मार्ट सुविधा पुरवण्याचे काम प्रगतीपथावर असताना, ब प्रभाग क्षेत्रातील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आणि निष्काळजीपणा स्पष्टपणे जाणवतो. नागरिकांमध्ये संतापाची भावना असून," स्मार्ट सिटी योजनेचे काम प्रामाणिकपणे असतानाच त्यावर असे माफियानी आणि ब प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांनी पाणी फेरण्याचे काम केले जाते?" असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान कल्याण डोंबिवली महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त अभिनव गोयल यांनी पदभार स्वीकारलापासून कामचुकार अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता वायलेनगर खडकपाडा परिसरात झोपडपट्टी वाढीव हातभार लावणाऱ्यावर कारवाई होणार का,या कडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

