कल्याणात महाराणा प्रताप सिंग जंयती उत्सव कार्यक्रम संपन्न
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण : कल्याणातील महाराणा क्षत्रिय राजपूत समाज सेवाभावी संस्थेच्या वतीने महाराणा प्रताप सिंग जयंतीचे आयोजन केले होते. कल्याण पश्चिमेतील सिध्दी विनायक हाँल मध्ये गुरूवारी महाराणा प्रताप सिंग जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्ताने भव्य मिरवणूक काढण्यात आली.
दुर्गाडी किल्ल्याजवळील रस्ता परिसरातील चौकास महाराणा प्रताप चौकाचे नामकरण देखील करण्यात आले. या प्रसंगी पाचोरा विधानसभेचे आमदार, राजपूत समाजाचे नेते किशोर पाटील उपस्थित होते. महाराणा क्षत्रिय राजपूत समाज सेवाभावी संस्था कल्याणच्या वतीने अध्यक्ष संजय राजपूत व त्यांच्या संपूर्ण टीमने कार्यक्रमाचे चांगल्या प्रकारे नियोजन केलं होतं.
याप्रसंगी महाराणा क्षत्रिय राजपूत सेवाभावी
संस्थेच्या वतीने ठाणसिंग पाटील यांना संस्थेतर्फे राजपूत समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. किशोर पाटील यांच्या हस्ते यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल योगेश राजपूत यांचा सत्कार करण्यात आला.
सूत्रसंचालन सचिव गोकुळ पाटील , सुवर्णा राजपूत यांनी केले
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कार्याध्यक्ष विनोद राजपूत यांनी केले. कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे मुख्य सल्लागार एम जी पाटील, विष्णू सिंग परदेशी, उपाध्यक्ष दिलीप पाटील, कोषाध्यक्ष व्ही आर पाटील, सहसचिव निलेश देवरे, सहकोषाध्यक्ष भूपेंद्र राजपूत, रवींद्र पाटील, रामसिंग राजपूत, महाराणा प्रताप यांच्या वेशभूषेत भटेसिंग राजपूत होते. तसेच, विशेष अतिथी विजयसिंह पाटील, आर के पाटील, महेंद्रसिंग राजपूत, सोनू सिंग राजपूत, संपर्कप्रमुख सोपान पाटील, महेंद्रसिंग जाधव, योगेंद्रसिंग राजपूत. भिकन देवरे उपस्थित होते. ठाणे डोंबिवली अंबरनाथ बदलापूर मुंबई उपनगर मधून, मुरबाड शहापूर येथील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्वांच्या सहकार्याने व महिला आघाडीने संपूर्ण सजावट व कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी अथक प्रयत्न केले.



