Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

आयरे गावात गटार साफसफाई दरम्यान आढळलेल्या अनधिकृत बांधकामावर महापालिकेची कारवाई


       

आयरे गावात गटार साफसफाई दरम्यान आढळलेल्या अनधिकृत बांधकामावर महापालिकेची कारवाई 

कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ग प्रभाग अंतर्गत, दिनांक २९ मे २०२५ रोजी आयरे गावात गटार व नाल्याच्या साफसफाईसंदर्भात प्रभागाच्या सहा. आयुक्त हेमा मुंबरकर यांनी निरीक्षण व पाहणी केली, यादरम्यान संबंधित परिसरात अनधिकृत चाळीचे बांधकाम आढळून आले.पाहणीवेळी महापालिकेच्या ग प्रभागाच्या पथकास १५ जोत्यांचे (फाउंडेशन) बांधकाम व ५ पूर्ण झालेल्या खोल्यांचे अनधिकृत बांधकाम निदर्शनास आले. सदर बांधकाम सार्वजनिक गटार व नाल्यावर अतिक्रमण करून करण्यात आले होते, त्यामुळे महापालिकेच्या ग प्रभागाच्या अतिक्रमण विरोधी पथकाद्वारे त्वरित निष्कासन कारवाई करून हे अनधिकृत बांधकाम पाडून टाकण्यात आले आणि परिसरात स्वच्छता व मोकळेपणा राखण्यात आलेला आहे.

महापालिकेने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की  कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम वा अतिक्रमण सहन केले जाणार नाही आणि याविरोधात सातत्याने कठोर पावले उचलली जातील.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.