Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

कल्याणीतील २१ वर्षीय तरुणीवर ड्रग्स इंजेक्शन देत गॅंगरेप - ४ पुरुष, २ महिलावर गुन्हा दाखल

 


कल्याणीतील २१ वर्षीय तरुणीवर ड्रग्स इंजेक्शन देत गॅंगरेप - ४ पुरुष, २ महिलावर गुन्हा दाखल  -

 कल्याणच्या सरकारी रेस्ट हाऊसचा वापर ; आरोपीपैकी  राजकीय संपर्क असलेला  एक ज्येष्ठ प्राध्यापक 

*****************************

कल्याण तालुक्यातील टिटवाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बल्याणी येते एका २१ वर्षीय तरुणीवर नशेचे इंजेक्शन व बियर जबरदस्तीने देत तिच्यावर वारंवार सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात ४ पुरुष व महिला विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरुणी ही आपल्या कुटुंबिया सोबतच राहत होती. दादीशी झालेल्या किरकोळ वादनंतर १९ मार्च २०२५ रोजी ती मैत्रीण झीनत कुरेशीच्या घरी गेली. झीनतच्या घरी तिचा पती इरफान मुलगा व शेजारीन शबनम शेखही होती,२५ मार्च रोजी सकाळी झीनत व शबनमने गुड्डू ,अब्दुल रहीम, गुलफाम अब्दुल रहीम यांना बोलवून, पीडीतेला घराकडे नेण्याच्या बहानाने आंबिवली  येथील एनारसी कॉलनी मागील एका खोलीत नेले. तेथे पीडितेला इंजेक्शन देऊन बेशुद्ध केले गेले. नंतर ती कल्याण रामबाग  मधील सरकारी रेस्ट हाऊसच्या ठिकाणी जागी झाली. तिने अंगावर कपडे नसल्याचे व तिच्यावर अत्याचार झाल्याचे जाणवले.पुढील ३-४ दिवस तिला सातत्याने ड्रग्स  देण्यात आल्याने ती बेशुद्ध अवस्थेत होती.  शुद्धीवर आल्यावर तिला

 आपल्यावर बलात्कार झाल्याचे लक्षात आले.तिने पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणातील आरोपींमध्ये लियाकत शेख नावाच्या मुरबाड येथील निवृत्त प्राध्यापकाची समावेश आहे,ज्याचे काही राजकीय नेत्यांशी घनिष्ठ संबंध असल्याचे समजते.त्यांनी नुकतेच शरद पवार गटात प्रवेश केला असल्याचीही माहिती समोर आली आहे.या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश कदम यांच्या नेतृत्वाखाली महिला पोलिस शिपाई  चंद्रभागा यांच्या मार्गदर्शाखाली पोलिस अधिक तपाशीलवर चौकशी करत आहेत.सरकारी रेस्ट हाऊसच्या या प्रकरणासाठी वापर झाल्याने प्रशासनाच्या जबाबदारीवर आहे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.