विधवा महिलेच्या मुलांना आणि रिक्षा अपघातातील पीडित कुटुंबांना मदतीची मागणी - माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी घेतली अतिरिक्त आयुक्त यांची भेट
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण पूर्वेतील कोळशेवाडी परिसरात ५ मे रोजी ॲम्बुलन्स उपलब्ध न झाल्याने सविता गोविंद वीराजदार या विधवा महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला. या महिलेचे पती पूर्वीच मयत झाले होते, आणि आता तिच्या मृत्यूनंतर त्यांची मुले रस्त्यावर आली आहेत. या अनाथ मुलांना तातडीने मदत मिळावी यासाठी महेश गायकवाड यांनी ८ मे २०२५ रोजी कल्याण डोंबिवली महापालिका अतिरिक्त आयुक्त हर्षद गायकवाड यांची भेट घेतली. यावेळी कल्याण पूर्व शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते संतोष नवले,रिक्षा चालक मालक युनियन अध्यक्ष, पदाधिकारी कार्यकर्ते,रिक्षा चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नुकत्याच आलेल्या वादळात रिक्षावर झाड कोसळून चालक व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना घडली, या अपघातात रिक्षाचालक व प्रवासी उमाशंकर वर्मा, तुकाराम शामराव खेगले, लता दत्ताराम राऊत यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संबंधित कुटुंबावर संकट ओढवले आहे.या दुर्देवी घटनेवर ढिसाळ कारभाराबाबत संताप व्यक्त करत माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी या सर्व पीडित कुटुंबांना शासकीय मदत मिळावी यासाठी निवेदन द्वारे मागणी केली.
