कल्याण पूर्व अनधिकृत मॉडेल कॉलेज वर कार्यवाही करण्याची मागणी,राहुल हुंबरे,
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण , दि ईस्ट कल्याण वेलफेअर सोसायटी संचालित मॉडेल कॉलेज हे अनधिकृत बांधकाम असून या प्रकरणी कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त व पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे,परंतु मॉडेल कॉलेज चे संचालक यांची राजकीय नेते मंडळी सोबत आर्थिक व्यवहार असल्याने ,मॉडेल कॉलेज वर कार्यवाही होत नसालीने स्थानिक नागरिक सामाजिक कार्यकर्ते राहुल हुंबरे यांनी आमरण उपोषण केले आहे,
सामाजिक कार्यकर्ते राहुल हुंबरे यांनी कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासना विरोधात एक मे या कामगार दिना निमित्ताने उपासनाश सुरवात करण्यात आली आहे,राहुल हुंबरे यांनी प्रसिद्धी पत्रकात महा पालिकेचे अनधिकृत बांधकामला महा पालिकेचा आश्रय असल्याने कोणतीच कारवाई होत नसल्याच्या विरोधात आमरण उपोषण कारण्याची वेळ आली आहे,असे मत राहुल हुंबरे यांनी व्यक्त केले,

