अहिल्याबाई होळकर यांचे महिला सशक्तीकरणाचे विचार समाजातील नागरिकांनी आठवण केली पाहिजे
महापालिका आयुक्त अभिनव गोयल
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती दिनी महानगरपालिकेतर्फे अभिवादन
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जयंती दिनी आज महापालिकेतर्फे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महापालिका मुख्यालयात महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यासमयी माहिती व जनसंपर्क विभागाचे उपआयुक्त संजय जाधव, कार्यकारी अभियंता मनोज सांगळे, सहा.जनसंपर्क अधिकारी सुमित बोयत, सहा.सुरक्षा अधिकारी सुरेश पवार, इतर कर्मचारी व अनेक समाजबांधव उपस्थित होते.
त्याचप्रमाणे अहिल्याबाई चौकातील अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यासही महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. अहिल्याबाई होळकर यांचे महिला सशक्तीकरणाचे विचार समाजातील नागरिकांनी आठवण केली पाहिजे, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी कल्याण डोंबिवली शहर हिंदु खाटीक समाज संघटनेमार्फत आयोजित अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंती दिनी कार्यक्रमात केले.
यावेळी महापालिका माहिती व जनसंपर्क विभागाचे उपआयुक्त संजय जाधव, कल्याण डोंबिवली शहर हिंदु खाटीक समाज संघटनेचे शहर अध्यक्ष समीर संभाजी मानकर, महिला अध्यक्षा मिनाक्षी शशिकांत खराटे, युवा अध्यक्ष ओमकार सुधीर निकम व महापालिका कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने समाजबांधव व नागरिक उपस्थित होते.




