राष्ट्रवादीने स्वागतासाठी लावलेली कमान भर रस्त्यात कोसळली,
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
कमान कोसळल्याने वाहन चालकांना सहन करावा लागला त्रास
कल्याण : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून काढण्यात आलेल्या महाराष्ट्र गौरव रथ कलश यात्रा कल्याणमध्ये दाखल झाली होती. या यात्रेच्या स्वागतासाठी दुर्गाडी चौकात भव्य कमान लावण्यात आली होती. या कमानावर यात्रेच्या स्वागत आणि राष्ट्रवादीच्या नेत्याचे फोटाे लावले होती. ही कमान आज कोसळून रस्त्यात पडली.
त्याचा त्रास वाहन चालकांसह पादचाऱ्यांना सहन करावा लागला. ही घटना घडून चार ते पाच तास उलटून गेले तरी रस्त्यात पडलेली कमान हटविण्यात आलेली नव्हती. बऱ्याच वेळेनंतर ही कमान हटविण्यात आली. मात्र या घटनेमुळे शहरात अशा प्रकारे रस्त्यात कमानी लावून नागरिकांना अडथळा ठरणाऱ्या कमानींबाबत कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.


