खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नातून एलिम्को तर्फे दोन दिवसीय तपासण्यासाठी शिबिर यशस्वीरित्या संपन्न
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्याa पुढाकाराने केंद्र सरकारच्या भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम ( एलीम्को) च्या सहकार्याने दिव्यांग बांधव आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी दोन दिवसीय मोफत तपासणी आणि सहाय्यक साहित्य वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर डोंबिवली पूर्व शहर मध्यवर्ती शाखेत २४ व २५ मे २०२५ रोजी स.१० ते सायं.५ या वेळेत पार पडले. या शिबिरात कल्याण लोकसभा मतदारसंघातील शेकडो लाभार्थ्यांनी सहभाग घेतला. शिबिरात प्रमाणपत्र धारक अस्थिव्यंग , बहुविकलांग ,सेरेब्रल पाल्सी,कर्णबधिर,अंध दिव्यांग बांधव तसेच ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी वैद्यकीय तपासणीनंतर गरजेनुसार सहाय्यक साहित्य मोफत वाटप करण्यात आले. वाटप करण्यात आलेल्या साहित्यामध्ये तीन चाकी सायकल, कुबड्या, वॉकिंग स्टिक,सीपी चेअर, श्रवणयंत्र,ब्रेल साहित्य,स्मार्ट फोन,कृत्रिम अवयव,व्हीलचेअर,
कमोडखुर्ची,ट्रॉयपॉड,ग्रीवा कॉलर,डेकर,एल एस बेल्ट याचा समावेश होता. या शिबिरात मात्र लाभार्थ्यांची वैद्यकीय तपासणी एलिम्कोच्या डॉक्टर आणि तज्ञ कर्मचाऱ्यामार्फत करण्यात आली. अधिकाधिक लाभार्थ्यांना योजना मिळावी यासाठी कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांच्या वतीने उत्पन्न दाखल्याचे वाटप करून विशेष सहकार्य करण्यात आले. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे, जिल्हा महिला संघटक लताताई पाटील, उपजिल्हाप्रमुख रवी पाटील व राजेश कदम, जिल्हा संपर्कप्रमुख विवेक खामकर, महिला आघाडीच्या कविता गावंड, तालुका प्रमुख महेश पाटील, संघटक अर्जुन पाटील,बालन मोरे,धर्मराज शिंदे,शैलेंद्र भोजने,माजी नगरसेवक संजय पावशे,महिला संघटक कल्पना पाटील,उप शहर प्रमुख दिनेश शिवलकर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात आत्मसन्मान निर्माण होऊन त्यांना अधिक सक्षम होण्यास मदत झाली आहे.

