महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या गलथान कारभार ॲम्बुलन्स वेळेवर उपलब्ध न झाल्याने विवाहित महिलेचा मृत्यू
दोषींवर कारवाई करण्याची मागणी,
कल्याण पूर्वेत राहणाऱ्या सविता बिराजदार ३५ वर्षीय महिलेच्या शरीराची एक बाजू सुन्न झाल्याने केडीएमसी च्या रुख्मिनी बाई रुग्णालयात सोमवारी दुपारी उपचारासाठी दाखल करण्यात आले प्रकृती गंभीर असल्याने रूग्णाच्या नातेवाईकांना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला देण्यात आला रुग्णांच्या नातेवाईक यांना अँब्युलन्स मिळण्यासाठी पाच तास लागले त्यामुळे वेळेत उपचार न मिळाल्याने रुग्णालय आवारात मृत्यू झाला .
मयत सविता यांच्या नातेवाईकांनी कळवा येथे घेऊन जाण्यासाठी तयारी केली मात्र रुग्णाला घेऊन जाण्यासाठी ॲम्बुलन्स नसल्याने पाच तास रुग्णालयात ऍम्ब्युलन्सची वाट पाहावी लागली यादरम्यान सविता यांचा मृत्यू झाला
सविता यांच्या नातेवाईकांनी ॲम्बुलन्स वेळेला मिळाली नसल्याने मृत्यू झाल्याने जबाबदार असलेल्या रुग्णालयातील डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे


