फुटपाथा वरील विक्रेत्यांवर महा पालिकेची धडक कारवाई
आयुक्तांचे सक्तीचे आदेश
कलम भूमि, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण डोबीवली महानगर पालिकेच्या महत्तवाच्या फूट पथा वर विविध प्रकारचा व्यवसाय करणारे व जागेवर कब्जा करणाऱ्या व राहदारी ला अडचण ठरणारे च्या विरोधात लोकांनी कल्याण डोंबिवली महा नगर पालिकेचे आयुक्त अभिमाव गोयल यांना तक्रारी केल्या होत्या, त्या तक्राची दाखल घेत महा पालिका आयुक्त गोयल यांनी कल्याण स्टेशन परिसर, शिवाजी चौक ते मोहम्मद अली चौक, भाजी मार्केट, इत्यादी प्रमुख मार्गांवर धडक कारवाई करण्यात अली,
माननीय आयुक्त महोदय श्री अभिनव गोयल यांच्या आदेशानुसार आणि माननीय उपायुक्त श्री अवधूत तावडे साहेब यांच्या निर्देशानुसार
कल्याण पश्चिम येथील शिवाजी चौक ते पुष्पराज हॉटेल ते कल्याण पश्चिम रेल्वे स्टेशन परिसरात फेरीवाल्यांवर धडक कारवाई करण्यात आली आणि त्या फेरीवाल्यांच माल जप्त करण्यात आला. सदर कारवाई करते वेळी मा. सहाय्यक आयुक्त श्री धनंजय थोरात साहेब , अधीक्षक श्री ज्ञानेश्वर कंखरे साहेब, श्री चिंतन बेरडिया (लिपिक) पथक प्रमुख श्री संदीप म्हात्रे तसेच श्री नागेश गोतसुर्वे व फेरीवाले कर्मचारी यांच्या सह कारवाई करण्यात आली.



