![]() |
सिलेंडरच्या स्फोटात कल्याणमध्ये चार दुकाने जळून खाक - सुदैवाने जीवितहानी टळली ; प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन
कलम भूमि, कल्याण प्रतिनिधि,
कल्याण पश्चिमेतील डॉ. आंबेडकर रोडवरील लोहार आळी येथे रविवारी पहाटे भीषण दुर्घटना घडली.एका वेल्डिंग दुकानात सिलेंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत चार दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली.यात लाखो रुपयांचे नुकसान झाले असले तरी, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सकाळी साडेपाचच्या सुमारास गौरसिया चाळीजवळील वेल्डिंग दुकानात सिलेंडरचा स्फोट झाला. या आगीत क्लासेसचे एक दुकान व कमउद्दिन शेख व निजामुद्दीन सय्यद यांच्या दुकानांसह चार दुकाने जळून खाक झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी वेळीच पोहचून दोन तासाच्या प्रयत्नात आग आटोक्यात
आणली.अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी सांगितले की, गॅस सिलेंडरमध्ये उष्णता निर्माण झाल्यामुळे आग लागल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.आग एवढी तीव्र होती की तिने काही क्षणात आजूबाजूच्या दुकानांनाही आपल्या विळख्यात घेतले.दरम्यान ,काही दिवसापूर्वी डोंबिवलीतही अशीच आग लागल्याची घटना घडली होती.त्यामुळे कल्याण - डोंबिवली महापालिका आयुक्तांनी रस्त्यालगत हातगाड्यावरील सिलेंडर वापरावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मात्र,अ प्रभागात सहायक आयुक्त प्रमोद पाटील यांचे दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. आंबिवली पश्चिम स्टेशनजवळील फुटपाथवर ,शहाड उड्डाण पुलाखाली चायनिज आणि वडापाव हातगाड्यांवर उघड उघड सिलेंडरचा वापर सुरू असल्याचे दिसत असून,तेथे कोणतीही कारवाई झालेली नाही. तसेच अ प्रभागात अनधिकृत बांधकामेही सर्रासह सुरू असल्याने,सार्वजनिक सुरक्षेच्या दुष्टीने महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी तत्काळ पावले उचलून पूर्ण चौकशी करून कार्यवाही करावी अशी मागणी जनतेकडून करण्यात येत आहे.

