पाकिस्तानचे १२०० अकाऊट ब्लॉक भारतीय अँपवरून अफवा पसरविण्याचा प्रयत्न हाणून पाडला
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
डोंबिवली – प्रत्येकाच्या हातातील मोबाईल क्षणात जगभरातील घडामोडी वापरकर्त्यापर्यत पोचवतो. याचाच फायदा घेत पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी सोशल मिडीयाच्या माध्यमातून भारता विरोधी अफवा पसरविण्याचा जोरदार प्रयत्न सुरु होता. संपूर्ण भारतीय बनावटीच्या असलेल्या i – ai या ऍपवरून या अफवा पसरवल्यास त्याच्यावर अधिक विश्वास ठेवला जाईल या हेतूने पाकिस्तानातून ऍपवर दिवसभरात १२०० हून अधिक रिक्वेस्ट धाडण्यात आल्या. मात्र नेहमीपेक्षा येणाऱ्या रिक्वेस्ट वाढल्याचे आणि त्यातही याद्वारे भारता विरोधी मेसेज पाठवले जात असल्याचे लक्षात येताच ऍपचे निर्मात्या डोंबिवलीकर तरुणांनी पाकिस्तानच्या सर्व रिक्वेस्ट फेटाळून हि अकाऊट ब्लॉक करत व्यवसायापेक्षा देशप्रेमाला महत्व दिले आहे.

डोंबिवलीतील कपिल अगरवाल या तरुणाने ओंकार मयेकर आणि ए आय तज्ञ यश कदम यांच्यासह देशभरातील तज्ञ इंजिनिअर्सना एकत्र आणून i-ai हे नवे कोरे ऍप बाजारात आणले असून सोशल मिडीयाववरील अनेक प्रचलित ऍपना हे ऍप टक्कर देत आहे. चार महिन्याच्या कालावधीत या ऍपचे 10 लाखापेक्षा अधिक सबस्क्राईबर झाले असून इतर ऍपच्या तोडीस तोड माहिती पुरविणारे ऍप लोकांच्या पसंतीस उतरत आहे. २२ एप्रिल
रोजी पहलगाम दहशतवादी हल्ला झाल्यानंतर पुढील काळात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या काळात सोशल मिडीयाच्या माध्यमातून पाकिस्तानी हॅकरनी सर्वच सोशल मिडिया प्लटफॉर्म वर बनावट अकाऊट तयार करून त्याद्वारे भारताविरोधी वातावरण तयार करण्याचा प्रयत्न चालवला होता. मात्र याची कुणकुण लागताच अग्रवाल आणि त्यांच्या टीमने त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडताना आपल्या वापरकर्त्या पर्यत चुकीची माहिती पोचू नये यासाठी दोन दिवसात १२०० पाकिस्तानी रिक्वेस्ट रिजेक्ट केल्या. देशप्रेमापुढे व्यवसाय कधीही मोठा नाही देशाबद्दल योग्य अशीच माहिती जगभरात पोचावी चुकीचे समज गैरसमज आपल्या माध्यमातून पसरले जाऊ नयेत याची काळजी घेऊनच आपण या रिक्वेस्ट फेटाळल्याचे अगरवाल यांनी सांगितले.

