Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

आंबेडकर श 82 च्यानवीन इमारतीचे भूमी पूजन नवीन इमारतीचे भूमिपूजन आमदार रविंद्र चव्हाण यांच्याहस्ते कामाला सुरवात कल्याण : डोंबिवली पूर्वेतील ब्राह्मणसभा हॉल मागे असलेल्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवली पूर्वेतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर कडोमपा शाळा क्र. ८२ या शाळेच्या नवीन इमारतीचा भूमिपूजन सोहळा आमदार रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी महापालिकेचे माजी पदाधिकारी, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, शहर अभियंता अनिता परदेशी, उप आयुक्त प्रसाद बोरकर, शिक्षण विभागाचे कार्यकारी अभियंता योगेंद्र .


 केडीएमसीच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर शाळा क्रमांक 82 च्या नवीन इमारतीचे भूमिपूजन

आमदार रविंद्र चव्हाण यांच्याहस्ते कामाला सुरवात

कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,

कल्याण : डोंबिवली पूर्वेतील ब्राह्मणसभा हॉल मागे असलेल्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवली पूर्वेतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर कडोमपा शाळा क्र. ८२ या शाळेच्या नवीन इमारतीचा भूमिपूजन सोहळा  आमदार रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी महापालिकेचे माजी पदाधिकारी, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, शहर अभियंता अनिता परदेशी, उप आयुक्त प्रसाद बोरकर, शिक्षण विभागाचे कार्यकारी अभियंता योगेंद्र राठोड, शिक्षणाधिकारी विजय सरकटे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.शाळेची नवीन इमारत तळ + 3 मजली असणार असून, यामध्ये 13 वर्ग खोल्या, 1 हॉल, 1 प्रिन्सिपल रूम, 1 अ‍ॅडमिन रूम अशा सुविधा उपलब्ध असणार आहेत. यासाठी 116.70लाख शासन निधी, 378.24 लाख महापालिका निधी असे एकूण 494.94 लाख रुपयांची तरतूद महापालिकेच्या अंदाजपत्रकात करण्यात आली असून, साधारणपणे 1 वर्षाच्या कालावधीत सदर इमारतीचे बांधकाम पूर्ण होईल.

या नवीन शाळा इमारतीमुळे परिसरातील विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण, दर्जेदार पायाभूत सुविधा आणि सुरक्षित शैक्षणिक वातावरण उपलब्ध होणार आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी भौतिक सोयी-सुविधा वाढवण्याचे हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. पालक, नागरिक आणि समाजातील सर्व स्तरातून या उपक्रमाचे स्वागत करण्यात आले आहे.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.