अवैध रेती वाहतूक प्रकरणी दोन बार्ज जाळून केले नष्ट महसूल विभागाची कारवाई ,
तहसीलदार ,सचिन शेजाळ
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण : कल्याण रेती बंदर परिसरात अवैध रेती वाहतूक प्रकरणी महसूल विभागाने दोन बार्ज सोमवारी रात्री जाळून नष्ट केल्या. 16 जून रोजी कल्याण येथील रेती बंदराजवळ अवैध वाहतूक होत असल्याबाबत व्हिडिओ वायरल झाला होता. या अनुषंगाने मंडळ अधिकारी कल्याण व मंडळातील सर्व तलाठी यांच्या पथकाने रेतीबंदराजवळ अवैध वाहतूक करणाऱ्या दोन बार्ज वर कार्यवाही करण्यात आली. यामध्ये दोन्ही बार्ज जाळून नष्ट करण्यात आलेले आसल्याची माहिती कल्याण तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिली.

