Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

ॲड. डॉ. राजु राम महाराष्ट्र प्रतिभा सन्मान पुरस्कार २०२५" ने सन्मानित

 

ॲड. डॉ. राजु राम महाराष्ट्र प्रतिभा सन्मान पुरस्कार २०२५" ने सन्मानित

कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी  ,

कल्याण : स्वराज्य प्रतिष्ठान आणि धडक कामगार युनियन महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या भव्य पुरस्कार वितरण समारंभात कल्याणचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तसेच "बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान" चे महाराष्ट्र राज्यातील सक्रिय सहसंयोजक ॲड. डॉ. राजु राम यांना "महाराष्ट्र प्रतिभा सन्मान पुरस्कार २०२५" प्रदान करण्यात आला.सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय व राजकीय क्षेत्रातून उल्लेखनीय व सातत्यपूर्ण समाजकार्य करत उपेक्षित, गरीब, गरजू, निराधार, अनाथ व वंचित मुले व विधवा महिला, जेष्ठ नागरीक घटकांना मदतीचा हात देत त्यांच्या पुनर्वसनासाठी झटणाऱ्या, तसेच "बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान" अंतर्गत मुलींच्या हक्क रक्षणासाठी आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी विशेष कार्य करणाऱ्या ॲड. डॉ. राजु राम यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा बहुमान देण्यात आला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नेत्रतज्ज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते डॉ. राजु राम यांना गौरवचिन्ह व सन्मानपत्र  देऊन गौरविण्यात आले.या सोहळ्याला अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी डॉ. तात्याराव लहाने यांनी आपल्या भाषणात सांगितले की "समाजासाठी निरंतर कार्य करणाऱ्या व्यक्तींना अशा पुरस्कारांद्वारे प्रोत्साहन मिळते. डॉ. राजु राम यांचे सामाजिक व ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानातील कार्य समाजासाठी प्रेरणादायी असून, नव्या पिढीसाठी आदर्श ठरेल."यावेळी ऍड. डॉ. राजु राम यांनी आपल्या भाषणात सांगितले की, "हा सन्मान माझ्या वैयक्तिक यशाचा नसून, समाजाच्या हितासाठी काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आहे. विशेषतः ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या अभियानासाठी हे एक मोठे बळकटीकरण आहे. हा पुरस्कार मला अधिक जबाबदारीने समाजासाठी व मुलींच्या हक्कांसाठी कार्य करण्याची प्रेरणा देतो."या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे कामगार नेते अभिजित राणे, डॉ. शितल मालूसरे, प्रमोद पाटील, संभाजीराव जाधवराव, आयोजन समाजसेवक सुरज भोईर, समाजसेविका ऍड शिल्पा राम तसेच महाराष्ट्रातील सर्वच क्षेत्रातील असंख्य सामाजिक, सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.