केडीएमसी तील आगामी पालिका निवडणुकीच्या १२२ सदस्य निवडीसाठी चार सदस्याचे २९ पॅनल
तर ३ सदस्य निवडीसाठी २ पॅनल अशा ३१ प्रभागाची (पॅनल) रचना
प्रभाग रचनेच्या सीमांकनासाठी राजकीय पक्षांसह इच्छुकांची धावपळ सुरू
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचे आदेश निवडणूक आयोगाने घोषित केल्या नंतर कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या आगामी पालिका निवडणुकीच्या प्रभाग रचनेच्या प्रारूप कामाला वेग आला आहे.महापालिका क्षेत्रात २०११ च्या लोकसंख्येनुसार २०१५ साली पार पडलेल्या पालिका निवडणुकीत आलेल्या १२२ प्रभागाची संख्या इतकीच प्रभागाची संख्या यंदाच्या पालिका निवडणुकीत जैसे थे ठेवण्यात आली आहे. पालिका क्षेत्रातील व २७ गावातील प्रभागा साठी चार सदस्यीय प्रभाग (पॅनल) पद्धतीने निवडणूक घेतली जाणार असल्याने एक प्रभाग ५० हजार मतदारांचा असणार असल्यामुळे १२२ सदस्य निवडीसाठी चार सदस्याचे २९ पॅनल तर ३ सदस्य निवडीसाठी २ प्रभाग (पॅनल) अशा ३१ प्रभागाची (पॅनल) रचना करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
प्रभाग रचना केल्या नंतर आता प्रभागांच्या सीमारेषा निश्चित करण्याच्या कामाला सुरुवात केल्याने प्रभागाची फोड कश्या पद्धतीने केली जाणार ती आपल्याला फायद्याची असणार की नुकसानीची असणार या साठी राजकीय पक्षासह इच्छुकांनी धावपळ करण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे प्रभाग रचनेची सुरुवात प्रभाग उत्तरेकडून केली जात असल्याने टिटवाळा प्रभागातून सुरुवात करावी की उंबर्डे प्रभागातून सुरुवात करावी असा यक्ष प्रश्न पालिकेच्या निवडणूक विभागाला पडला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेची २०११ च्या जनगणनेनुसार १८ लाख लोकसंख्या गृहीत धरून २०१५ च्या २७ गावासह निवडणुका घेण्यात आल्या होत्या. २०१५ साली पार पडलेल्या पालिका निवडणुकीत सर्वाधिक ५३ तर भाजपा ४३ जागेवर निवडून आल्या होत्या. त्या खालोखाल मनसेने ९, काँग्रेस ४,राष्ट्रवादी काँग्रेस २,एमआयएम व बसपा प्रत्येकी एक एक तर अपक्ष ९ असे एकूण १२२ नगरसेवक आले होते. १९९५ साला पासून २०१५ सालाच्या पाच पालिका निवडणुक केवळ २००५ साली पारपडलेल्या निवडणुकीत अडीज वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पालिकेवर सत्ता मिळवित शिवसेनेच्या वर्चस्व खंडित केले होते. त्या नंतर सेनेचे वर्चस्व कायम राहीले आहे. मात्र शिवसेना पक्षाच्या पक्ष फुटी नंतर शिवसेनेत दोन गट पडल्याने राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. हीत्यातच कल्याण डोंबिवली महापालिकेत १९९५ पासून सुरु झालेल्या निवडणुकीत कायमच एक प्रभाग निवडणूक झाल्याने आगामी होऊ घातलेल्या पालिका निवडणुका पॅनल पद्धतीने घेतली जाणार आहे. लोकप्रतिनिधी आणि मतदार देखील प्रकारचं या पॅनल पद्धतीच्या निवडणुकीला सामोरे जाणार असून बहुसदस्यीय म्हणजे पॅनल पद्धतीच्या निवडणुकीची सवय नसल्याने लोकप्रतिनिधीनी धास्ती घेतली आहे. तर दुसरीकडे प्रशासन देखील प्रथमच पॅनल पद्धतीची आखणी करत असल्याने सीमारेषा निश्चित करताना कर्मचार्याची कसरत सुरु आहे. २०२२ साली निवडणूक आयोगाच्या आदेशाने कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडून त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीने घेण्यासाठी प्रभाग प्रारूप रचना आराखडा जाहीर करीत १२२ प्रभागाचे सीमांकन करून त्रिसदस्यीय पॅनल पाडण्यात आले होते. त्यावेळी ही प्रभागाची फोड करताना पालिकेच्या निवडणूक विभागातील कर्मचाऱ्याची चांगलीच तारांबळ उडाली होती आता पुन्हा नव्याने १२२ प्रभागां मध्ये चार प्रभागाचा एक प्रभाग अशी फोडा करावी लागणार असून कोणकोणते प्रभाग एकमेकांना जोडून पॅनल तयार केले जाणार व त्या प्रभागाच्या सीमांकन रचनेच्या आराखडा तयार करण्याच्या कामाला सुरूवात केली असल्याने याकडे सर्वच राजकीय पक्षांचे व नव्याने निवडणुकीत उभे राहणाऱ्या इच्छुकांना उत्कंठा लागली आहे. चार सदस्यीय पॅनल मध्ये उमेदवारांना केवळ आपल्या प्रभागातील नव्हे तर संपूर्ण पॅनल म्हणजेच चारही उमेदवाराच्या मतदार संघातील मतदारांची मते मिळवावी लागणार असल्याने आपल्या प्रभागा सह आजुबाजूच्या प्रभागातील मतदारांची गाठी भेटी घेऊन त्याची कामे करण्याची सुरुवात निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या इच्छुकांनी केली आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात २०११ च्या लोकसंख्येनुसार ४९ ते ५० हजार मतदारांचा एक प्रभाग असे २९ प्रभाग चार सदस्यांचा पॅनल असलेले तर उर्वरित २ प्रभाग ४० ते ४५ हजार मतदारांचे तीन सदस्यांचा पॅनल अशा ३१ प्रभागाची (पॅनल) रचना करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली .२७ गावाचा विषय न्यायालयात प्रलंबित असला तरी आताची प्रभाग रचना गावांसह करण्यात आली आहे.
