वाहतूक पोलिस आणि वाहनचालकात भर रस्त्यावर हाणामारी
कल्याण नगर मार्गा वरील शहाड उड्डाण पुलाजवळ वाहतूक कोंडी
शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली घटना, व्हिडियो व्हायरल
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण :- कल्याण नगर राष्ट्रीय महामार्गच्या शहाड उड्डाण पुलाजवळ काल मध्यरात्रीच्या सुमारास वाहनांची भीषण वाहतूक कोंडी झाली. रस्त्यावरील वाहनांची वाहतूक कोंडी सोडवताना वाहतूक पोलिस आणि वाहनचालकामध्ये चक्क रस्त्यावरच जोरदार हाणामारी झाली. आहे,
वाहतूक पोलिसाच्या शिवीगाळ आणि मारहाण नंतर वाहतूक कोंडीत अडकलेल्या संतप्त वाहनचालकाने प्रतिउत्तर देत भर रस्त्यात वाहतूक पोलिसाला मारहाण केली. तब्बल अर्धा तास राडा सुरू असल्याने परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाले होते. अखेर इतर वाहनचालकांनी हस्तक्षेप करत वाद मिटवला. या हाणामारीचा व्हिडियो सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. यासंदर्भात महात्मा फुले स्टेशन मध्ये गुन्हा दाखल असल्याचे समजते.
