केडीएमसी क्षेत्रात क्लस्टर योजना राबविण्याच्या मागणीसाठी सीपीआय आक्रमक
दत्तनगर प्रभागातील नागरिकांची केडीएमसी मुख्यालयावर धडक
15 ऑगस्ट पर्यंत मागणी मान्य न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर काळे झेंडे नेणार
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात क्लस्टर योजना राबविण्याच्या मागणीसाठी सी.पी.आय. एम.एल. पक्ष आक्रमक झाला असून डोंबिवलीतील दत्तनगर प्रभागातील नागरिकांनी केडीएमसी मुख्यालयावर मोर्चा काढत धडक दिली. 15 ऑगस्ट पर्यंत मागणी मान्य न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर काळे झेंडे नेणार असल्याचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.केडीएमसी क्षेत्रांमध्ये दत्तनगर मौजे आयरे येथे महाराष्ट्र शासन या जागेवरील जीर्ण, अनधिकृत इमारती चाळी यांच्या करता प्राध्यानाने क्लस्टर गृहनिर्माण योजना राबविण्या करिता बायोमेट्रिक सर्वेक्षण होऊन पडताळणीही पूर्ण होत आहे. शासनाच्या जागेवर क्लस्टर पुनर्वसन योजना राबवण्यासाठी आवश्यक असलेले बहुतांश क्षेत्र सर्वे ल ९३ अ/६३, मौजे आयरे, डोंबिवली (पूर्व) दत्तनगर येथील पडताळणीठी बहुतांश झालेली आहे. तसेच शासनाच्या जागेच्या बाजूचा परीसराचे ही सर्वेक्षण झालेला आहे. त्यांची सर्वेक्षण यादी प्रकाशित करावी.
रहिवाशांची सर्वेक्षण यादी प्रदर्शित करून, ती शासनाकडे मंजुरीसाठी पाठवून तातडीने विकासक नेमण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, तसेच अन्य जागेवरील पडताळणीचे काम शिबिर लावून पूर्ण करावे जेणे करून ते लवकर होईल. व क्लस्टर सर्वेक्षणा करिता नेमलेल्या ठेकेदारांवर कारवाई करून त्यांना काढून टाकावे आदी मागण्या असून या मागण्या 15 ऑगस्ट पर्यंत पूर्ण न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर काळे झेंडे नेण्याचा इशारा सीपीआय डोंबिवली सदस्य सुनील नायक यांनी दिला

