कल्याण आरटीओ क्षेत्रात रिक्षा भाडेवाढ लागू मीटर भाड्यात 3 रुपये वाढ तर शेअर भाड्यात 3 ते 5 रुपये वाढ
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण : कल्याण आरटीओ क्षेत्रात रिक्षा भाडेवाढ लागू करण्यात आली असून मीटर भाड्यात 3 रुपये वाढ तर शेअर भाड्यात 3 ते 5 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. रिक्षाची भाडे वाढ चार महिन्याच पूर्वी सरकारने दिली आहे. पूर्वी रिक्षाचे मीटर भाडे २३ रुपये होते. त्यात तीन रुपये वाढ करुन २६ रुपये करण्यात आले आहे. प्रवाशांना बोजा पडू नये म्हणून आम्ही भाडेवाढ लागू केलेली नव्हती.रिक्षा मीटरचे रिकॅलीब्रेशन होणे बाकी होते. आत्ता ९५ टक्के काम झाले आहे. वाहतूक शाखेकडून ओवर सीटवर कारवाई सुरु केली आहे. दहा हजार रुपयांचा दंड वसूल केला जात आहे हे अन्यायकारक आहे. याबाबत सरकारकडे दाद मागणार असून भाडेवाढ प्रत्येक रूट आणि शहरात झाली आहे. शेअर रिक्षात तीन ते चार रुपये भाडे वाढ करण्यात आलेली आहे. महागाई ही प्रत्येकाला आहे. त्यानुसार ही भाडेवाढ सरकारने दिली असून प्रवाशांनी सहकार्य करण्याचे आवाहन रिक्षा टक्सी चालक मालक संघटनेचे उपाध्यक्ष संतोष नवले यांनी दिली.
