राष्ट्रीय कराटे स्पर्धेत डोंबिवलीच्या विद्यार्थ्याने जिंकले कांस्यपदक
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण : उत्तराखंडमधील देहरादून येथे झालेल्या चौथ्या कराटे इंडिया ऑर्गनायझेशन राष्ट्रीय कराटे स्पर्धेत डोंबिवलीच्या चॅम्पियन्स कराटे क्लबचा खेळाडू मोहित जाधव याने चमकदार कामगिरी करत कांस्यपदक जिंकले. या कामगिरीसह त्याने संपूर्ण भारतात तिसरे स्थान मिळवून शहराचे आणि चॅम्पियन्स कराटे क्लबचे नाव उंचावले आहे.
कल्याण-डोंबिवली विभागातील तीन खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यांच्या गटात प्रणय मोरे आणि दृष्टी डोभाल यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. हे सर्व विद्यार्थी सीकेसी महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि प्रशिक्षक सेन्सी विजय महाडिक आणि सेनपाई सुशांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित कराटे प्रशिक्षण घेत आहेत. सीकेसीचे संस्थापक संतोष मोहिते यांनीही त्यांच्या यशात महत्त्वपूर्ण योगदान दिले आणि विद्यार्थ्यांना अभिनंदन केले. आगामी स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.

