बी.के. बिर्ला महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण : विद्यापीठ अनुदान आयोग आणि बी.के. बिर्ला महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या निधीतून 'योग, तत्वज्ञान आणि प्रेक्टिस' आणि महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण आणि क्रीडा विभागाने कैवल्यधाम योग केंद्र, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने योग शिबिराचे आयोजन केले होते.११ व्या जागतिक योग दिनानिमित्त, महाविद्यालयाने 'एक आरोग्य, एक पृथ्वी' या थीमवर योग दिनाचे आयोजन केले होते, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. या शिबिरात कैवल्यधाम योग गुरु श्रीमती नीता पवार, आंतरराष्ट्रीय योग सुवर्णपदक विजेती ऋषिका कदम आणि राष्ट्रीय योग खेळाडू उत्कर्ष पितांबरे यांनी योग साधकांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना संबोधित करताना महाविद्यालयाचे शिक्षण संचालक डॉ. नरेश चंद्र यांनी सांगितले की त्यांनी योगाला त्यांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनवावे. प्राचार्य डॉ. अविनाश पाटील यांनी विद्यार्थ्यांना योगाबद्दल जागरूक राहण्याचे आवाहन करून प्रोत्साहित केले.या कार्यक्रमात उपप्राचार्य डॉ. हरीश दुबे, नाईट कॉलेजचे प्राचार्य डॉ. बिपिन वाडेकर, अनिल सहल आणि इतर अधिकारी उपस्थित होते. महाविद्यालयाच्या योग केंद्राच्या संचालिका डॉ. अर्चना सिंह यांनी सर्वांचे स्वागत केले. इतर सहभागींमध्ये डॉ. कांतिलाल नागरे, डॉ. संदेश जयभाई, प्रकाश संसारे, क्रीड़ा विभागचे संचालक अनिल तिवारी, रेवती हंसवाडकर, मिताली सावंत, डॉ. किरण रायकर, डॉ. सीताराम म्हस्के, राकेश भोईर, डॉ. श्याम सुंदर पांडेय, गणेश कुमावत, चिंतामन पाटील, राकेश ठाकरे, अक्षय टेंबे, शुभम मोहपे, नितीन शर्मा आणि इतर प्राध्यापकांचा समावेश होता. महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. वाय.डी. बागराव यांनी सर्व पाहुण्यांचे आभार मानले.
