Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात सोयी सुविधांचा अभाव

 

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात सोयी सुविधांचा अभाव

कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,

कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे ग्राहक विक्रेते हैराण तर चिखलातून वाट काढत करावी लागते खरेदी  

कल्याण : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात पसरलेले कचऱ्याचे ढिगारे आणि काही भागातील चिखलमय रस्ता पाहता तसेच कचऱ्याच्या सुटलेल्या  दुर्गंधीमुळे डंपिंग ग्राऊंडवर आल्याचा भास फुलभाज्या, फळ भाज्या, तसेच फळे फुले खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांना होत आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये दररोज साधरण लहान मोठ्या सुमारे 100हून अधिक गाड्यांमधून शेतकरी मालाची आवक होते. कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात सोयी सुविधांचा अभाव पाहता शेतकरी शेड मधील तरकारी  घेण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना चिखल युक्त रस्त्यातून मार्ग काढीत खरेदी करावी लागत आहे. फुल मार्केटचे  केडीएमसी आणि कृषी उत्पन्न बाजार समिती भिंजत घोंगडे कायम असून तोडलेल्या फुल मार्केट समोर तात्पुरती शेड उभारून त्यातच फुल मार्केट सुरू आहे. फुल मार्केट लगतच्या  रोडलगत कुजलेल्या फुलाच्या कचऱ्याचे ढिगारे पाहता, कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील अस्वच्छता ही संभाव्य रोगराईला कारणीभूत ठरू शकते.         

याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव संजय ऐडगे यांनी सांगितले की, संदर्भीत कचरा उचलण्यासाठी प्रतिमाह साडे आठ लक्ष रू. ठेकेदाराला देत असून तो कचरा शहराबाहेर त्यांच्या खाजगी जागेत डंपरने नेतो. बाजार समिती केडीएमसीला सुमारे 70लक्ष कर भरते. तसेच गाळेधारक देखील मनपाला टँक्स भरतात. पंरतु कचरा, दिवाबत्ती आदी सुविधा बाबत मनपा काही एक करीत नाही. फक्त टँक्स घेते तर केडीएमसी च्या अख्यारितील फुल मार्केटचा कचरा देखील आम्हीच उचलतो.          

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीवर सद्यस्थितीत प्रशासकीय राजवट असून, 29 जून रोजी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणूका होत आहेत. याकडे राजकीय क्षेत्रातील दिग्गाजांचे लक्ष असून, आजी माजी संचालक देखील या निवडणूकीत रिंगणात उतरले असून कृषी उत्पन्न बाजार समितीतील अस्वछता, सोयी सुविधांचा अभाव, कचऱ्याचे ढिगारे हा मुद्दा देखील यानिमित्ताने प्रचाराचा मुद्दा बनल्याचे दिसून आले आहे.याबाबत केडीएमसी घनकचरा व्यवस्थापन उप आयुक्त प्रसाद बोरकर यांनी सांगितले की, बाजार समिती आवारात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची योग्यती विल्हेवाट लावणे ही कृषी उत्पन्न बाजार समितीचे काम असून कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील कचऱ्यामुळे, अस्वच्छेतेमुळे संभाव्य नागरी आरोग्य प्रश्न निर्माण होऊ नये याबाबत सूचना करणार  असल्याचे सांगितले.


दरम्यान एकीकडे मनपा क्षेत्रातील वाढीव शुल्क कमी होण्यासाठी राजकीय पक्षांचा एल्गार सुरू असताना केडीएमसी क्षेत्रातून बाजार  बाजार समितीची कचरा वाहतूक होत आहे. ती शास्त्रीय मापदंडानुसार होते की नाही. हे पाहत कचरा वाहतूक शुल्क आकरणी मनपा का करीत नाही ?असा सवाल जाणकारांकडून यानिमित्ताने होत आहे.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.