कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण डोंबिवली महापालिका च्या हाकेच्या अंतरावर असलेल्या शिवाजी चौक ओक टॉवर येथे शिवाजी महाराजांचा अर्ध पुतळा असून महापालिकाप्रशासन आणि राजकीय पक्षाच्या सर्व नेत्यांनी वेळोवेळी जयंती पुण्यतिथी, व विविध कार्यक्रमा निमित्ताने महाराजांना सन्मान करण्यात येतो शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्प हार घालून ,त्यांना मानवदांना देण्यात येते,
असे असताना शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाची महा पालिकेला विसर पडला असल्याचे दिसून आले, असे मत
शिवसेना नेते व विधान सभा शहर सह संघटक रुपेश भोईर यांनी प्रशासना वर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे,रुपेश भोईर यांनी महापालिकाच्या अधिकाऱ्यांना शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक असल्याचे सांगितले असता महा पालिकेच्या अधिकारी वर्गाने तडका फडकी लायटिंग चे काम सुरू करत शिवाजी महाराजाच्या पुतळ्याच्या परिसरातील स्वच्छता सुरू करण्यात आली आहे ही गंभीर बाब असून महापालिकाप्रशासन चा जाहीर निषेध रुपेश भोईर यांनी व्यक्त केला आहे,
रुपेश भोईर यांच्या निषेधाने महापालिका अधिकारी वर्ग सर्तक झाला पण उपलब्ध झाले नसुन कल्याण मधील शिव प्रेमी जनते मध्ये नाराजीचे सूर उमटू लागले आहेत,विधान सभा सहसंघटक रुपेश भोईर यांनी शिवाजी महाराज पारसरातील साफ सफाई चे काम ठाकरे सेनेचे कर्मठ शिव सैनिकानी केले असल्याचे सांगण्यात आले, उद्धव ठाकरे पक्षाचे दत्तकुमार खंडागळे ,राजेंद्र दीक्षित,अमोल गायकवाड ,राजेश महाले ,सुरेश सोनार,इत्यादी शिव सेना कार्यकर्ते उपस्थित होते, शहर संघटक बाळा परब यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्प हार घालून,जय शिवाजी जयभवानीच्या घोषणांनी संपूर्ण शिवाची चौकात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते,





