शिवराज्याभिषेक सोहळा च्या पूर्वसंध्येला डोंबिवली येथील शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरणं खा,श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले,कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
डोंबिवली,कल्याण डोंबिवली महापालिका तथा राज्य शासना च्या निधीतून साकार झालेल्या पूर्ण आकृती पुतळ्याचे अनावरणं खा श्रीकांत शिंदे, भा ज पा कार्य अध्यक्ष रवींद्र चव्हाण पाहापलिका आयुक्त अभिनव गोयल आमदार राजेश मोरे,आमदार सुलभा गायकवाड,माजी आमदार आप्पा शिंदे शिव सेना नेते रवी पाटील भा जा पा नेते शशी कांबळे भा जा पा जिल्हा अध्यक्ष नंदू परब शिवसेना नेते गोपाल लांडगे व आजी माजी नगर सेवक कार्यकर्ते आदी मान्यवरांच्या उपस्थितितीत दिव्य भव्य शिवाजी महाराजांचा पूर्ण कृती पुतळ्याचे अनावरणं खा श्रीकांत शिंदे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला,
महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे आनावरण करताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिवाजी महाराजांचा पुतळ्याच्या आवरणाच्या प्रसंगी डोंबिवली कर जनतेचे आभार व्यक्त करत सतत तीन वेळा खासदार म्हणून काम करन्याचे सौभाग्य माला लाभले आहे, मी मना पासून डोंबिवली करांचे आभार व्यक्त करतो,असे मत व्यक्त केले,
गाडा सर्कल येथील शिवाजी महाराज पुतळ्याचे अनावरण एका वर्षापूर्वी केल्याचे भाषणात बोलताना म्हणाले की डोंबिवलीकरच्या भावी पिढीला शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून नवीन प्रेरणा घेता येईल
भारताचे पंत प्रधान मा,नरेंद्र मोदींनी माझ्यावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली होती, सहा जणांच्या शिष्ट मंडळाचा प्रमुख म्हणून पेहालगम मध्ये पाकिस्तानी अंतकी हल्ला करून अमानुष पने पर्यटकांना गोळ्या घालून ठार केले याचा जगातील अनेक देशांनी पाकिस्तानचा निषेध केला जात होता,पाकिस्तानचा खरा चेहरा जगा समोर आणण्याची जवाबदरी मी योग्य प्रकारे मांडली होती ,हे फक्त भारताचे पंत प्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या मुळे शक्य झाले आहे, असे मत श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले, भारत हा तिसरी मोठी अर्थ व्यवस्थेच्या प्रगती पथावर अग्रसर होत असल्याचे मत श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले,
डोंबिवली शहराला सांसृतिक शहर म्हणून ओळखले जाते, या शहराला अटल बिहारी वाजपेयी,बाळा साहेब ठाकरे आदी मोठ्या लोकांचा सहभाग असल्याचे मत रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले,डोंबिवली शहरातील दानशूर व्यक्तींनी सन १९७६ साळी प्रथम शिवाची महाराजांचा पुतळ्याची स्थापना करण्यात आली होती,असे मत रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले,
कल्याण डोंबिवली महापालिका चे आयुक्त अभिनव गोयल यांनी खा श्रीकांत शिंदे,रवींद्र चव्हाण सुलभा गायकवाड आप्पा शिंदे राजेश मोरे इतर मान्यवर व कार्यकर्ते चे स्वागत केले ,शहर अभियंता अनिता परदेशी यांनी आभार व्यक्त केले,



