केडीएमसी रिंग रोडवरील अपघात सत्र सुरूच
डंपरच्या धडकेत एका चार चाकीसह तीन दुचाकीचे नुकसान
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील रिंगरोड रस्त्यावर कोळवली परिसरात एका डंपरने दिलेल्या धडकेत एका चारचाकीसह तीन दुचाकींचे नुकसान झाले. यामध्ये सुदैवाने जिवितहानी टळली आहे.
कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रातील शहराअंतर्गत होणारी वाहतूक कोंडी कमी होण्याच्या दुष्टीकोनातून एमएमआरडीए मार्फत शहराबाहेरून रिंगरोडचे काम सुरू असून करोडो रू खर्च करून एमएमआरडीएमार्फत सुरू असलेल्या या रस्त्याचे काम काही टप्प्यात झाले असून भूसंपादन प्रक्रिया केडीएमसी मार्फत केली जात आहे. तब्बल पाच वर्षाचा कालावधी ओलांडून देखील रस्त्याचे काम पूर्णत्वास गेले नसून ज्या टप्प्यात रस्त्याचे काम झाले आहे. तिकडून वाहनांची ये जा करण्यासाठी वापर होत असून कोळवली परिसरातील 90फूटी रिंगरोड रस्त्यावर गुरुवारी सकाळी एका डंपरने दिलेल्या धडकेत पार्किंग केलेल्या एका चार चाकीसह, तीन दुचाकींचे नुकसान झाले. यात सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अपघाताला कारण बनत आहे.
प्रशासनाने आती तरी लक्ष देऊन रिंगरोडचे काम पूर्णात्वस नेले पाहिजे. अशी मागणी यानिमित्ताने जोर धरू पाहत आहे. यापूर्वी ही बारावे परिसरात टिटवाळा रिंगरोड परिसरात अपघाताच्या घटना घडल्या आहेत. बारावे परिसरातील रिंगरोड परिसरात वेगवान गतीने बाईक चालविणाऱ्या वर चाप बसण्यासाठी रस्ता खोदून बंद करण्यात आला होता. अपूर्ण अवस्थेतील रस्त्याचा वापर आणि मोकळा रस्ता पाहता वाहने चालक शार्ट कट मार्ग म्हणून या रस्त्याचा वापर करतात. या बाबत प्रशासनाने खमकी भुमिका घेत आता तरी रिंगरोड रस्ता पूर्ण केला पाहिजे अशी नागरिकांची मागणी आहे.
याबाबत एमएमआरडीएचे अभियंता राज देवरे यांच्याशी संपर्क साधला असता रिंगरोड केलेल्या रस्त्यावर वाहानांची गती, धोकादायक वळणे आणि आवश्यक त्या ठिकाणी वाहने सावकाश चालविणे या संदर्भात सूचना फलक लावण्या संदर्भात केडीएमसीला पत्र देणार असल्याचे सांगितले.



