9/आय प्रभागातील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची कारवाई
10 बांधकाम धारकांवर गुन्हे दाखल; संबंधित बांधकामे निष्कासित करण्याचे नियोजन
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून, 9/आय प्रभागात साजीद हुसैन यांच्यासह एकूण 10 बांधकाम धारकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हायलाईट्स:
- तळ + 2 मजली अनधिकृत घरावर एम.आर.टी.पी.अंतर्गत नोटीस बजावली
- बांधकाम हटवण्याच्या आदेशाची दुर्लक्षीती; बांधकाम पुन्हा सुरू
- स्थानिक पोलीस बंदोबस्तात संपूर्ण बांधकाम निष्कासित करण्याचे नियोजन
- महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 व महापालिका अधिनियम 1949 अंतर्गत गुन्हा दाखल
महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या आदेशानुसार, प्रभाग क्षेत्रात अनधिकृत बांधकाम दिसल्यास तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने, 9/आय प्रभागाचे सहायक आयुक्त भारत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.
गोळवली येथील सदर बांधकामावर यापूर्वी नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, बांधकाम हटवण्यात आले नाही. उलट ते पुन्हा सुरू करण्यात आल्यामुळे कठोर पावले उचलण्यात आली आहेत.
स्थानिक पोलीस बंदोबस्ताच्या साह्याने संबंधित बांधकाम पूर्णतः निष्कासित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती भारत पवार यांनी दिली.
गोळवली येथे सुरू असलेले अनधिकृत बांधकाम, ज्यावर महापालिकेने कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे

