कल्याण प्रेस क्लब च्या अध्यक्षपदी आनंद मोरे तर कार्याध्यक्षपदी कुणाल म्हात्रे यांची निवड
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण : कल्याण प्रेस क्लबला पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याने रौप्य महोत्सवही सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रेस क्लब च्या नविन कार्यकारणीची निवड करण्यात आली आहे. पत्रकारिता क्षेत्रात पत्रकार व अन्य समाजघटकासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या प्रेस क्लब कल्याणच्या अध्यक्षपदी लोकमतचे छायाचित्रकार आनंद मोरे यांची तर कार्याध्यक्षपदी पत्रकार कुणाल म्हात्रे यांनी निवड करण्यात आली आहे.पत्रकारांना शासकीय कोट्यातून स्वतःची घरे व अन्य शासकीय योजना आणि सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात करणार असून प्रेस क्लबचा रौप्य महोत्सवही सोहळा संपन्न करण्यासाठी सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन कार्य करणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष आनंद मोरे यांनी या प्रसंगी सांगितले. कल्याण डोंबिवली शहर परीसरात गेल्या पंचवीस वर्षा पासून नोंदणीकृत असलेली पत्रकार संघटना म्हणून कल्याण प्रेस क्लब कार्यरत आहे. प्रेस क्लब ची सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली त्यात आगामी दोन वर्षासाठी विविध प्रकारची कार्यपद्धती पार पाडण्याकामी नविन कार्यकारणीची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यात अध्यक्ष म्हणून आनंद मोरे , कार्याध्यक्ष पत्रकार कुणाल म्हात्रे, सचिव म्हणून विष्णुकुमार चौधरी यांच्यासह उपाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार रमेश दुधाळकर, अशोक वर्मा , खजिनदार सचिन सागरे तसेच कार्यकारणी सभासद म्हणून जेष्ठ पत्रकार नवीन भानुशाली, अतुल फडके , अशोक कांबळे, दत्ता भाठे , रवी चौधरी , तर प्रेस क्लबचे सल्लागार म्हणून जेष्ठ पत्रकार सुचिता करमरकर, दीपक जोशी आदींची सर्वानुमते नेमणूक करण्यात आली. सभेच्या सुरवातीला मागील सभेचे इतिवृत्त व गेल्या वर्षाचा आर्थिक जमाखर्च ताळेबंद अध्यक्ष विष्णुकुमार चौधरी यांनी वाचून दाखविले व ते मंजूर करण्यात आले. शहर परिसरातील पत्रकाराना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी कार्य करणे , प्रत्येक पत्रकारांचा जीवन विमा तसेच मेडीक्लेम , पोलीस यंत्रणा , महापालिका प्रशासक , प्रशासन व नागरिक यांच्यात संवाद साधण्यासाठी आणि नागरी समस्यांचे निवारण करण्यासाठी वार्तालाप , परिसंवाद आयोजित करणे आजच्या महाविद्यालयिन युवापिढीला सायबर सेल व सोशल मिडिया याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी तज्ञांचे सेमिनार आयोजित करणे व पत्रकारिता क्षेत्रात नाविन्यपूर्ण कार्य करणार्यांनाचा विशेष सन्मान यासह अन्य उपक्रम कल्याण प्रेसच्या माध्यमातून व सर्व सहकारी सदस्यांच्या मदतीने राबविणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष आनंद मोरे यांनी सांगितले.विविध राजकीय पक्षांच्या नेते मंडळी, महानगरपालिका पदाधिकारी आयुक्त व अन्य विभागाच्या अधिकाऱ्याचे सेमिनार मार्गदर्शन तसेच पत्रकाराच्या हिताच्या सेवा सुविधा व योजना राबविणे याबाबत उपस्थित सदस्यांनी सुचना केल्या प्रेस क्लब ला पंचवीस वर्ष पूर्ण होत असल्याने रौप्य महोत्सवही सोहळा कसा साजरा करण्यात यावा याबाबत अनेकांनी मत व्यक्त केली. तसेच सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवून पुन्हा अध्यक्ष पदी निवड केली याबाबत नवनिर्वाचित अध्यक्ष आनंद मोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
