Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

श्री अंबाबाई प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजन

 

माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त राबविले विविध उपक्रम

श्री अंबाबाई प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजन

कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी 

कल्याण : भारतीय जनता पार्टीचे माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री अंबाबाई प्रतिष्ठान यांच्या वतीने कल्याण पूर्वेतील संत निरंकारी भवन, पिसवली  येथे विविध सामाजिक उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले. यामध्ये रक्तदान शिबीर, लहान मुलांना शालेय साहित्य वाटप, १०वी १२वी आणि पदवीधर गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव, कला क्रीडा व शिक्षण क्षेत्रातील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार, ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप आदींचा समावेश होता.

कल्याण पूर्वच्या आमदार सुलभा गायकवाड यांच्याहस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार, शालेय साहित्य वितरण आणि ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप करण्यात आले. ही केवळ वाढदिवसाची औपचारिकता नव्हे, तर सामाजिक जाणिवेची सजीव अनुभूती होती. अंबाबाई प्रतिष्ठान पिसवली, विभागातील कोल्हापूर वासियांसाठी कार्यरत आहे. विविध सामाजिक कार्य करत असलेले हे प्रतिष्ठान  प्रत्येक वर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असते. 

      यावेळी आमदार सुलभा गायकवाड यांच्यासह संत निरंकारी मिशनचे सेक्टर संयोजक  जगन्नाथ म्हात्रे, प्रबंधक शंकर सहानी, जगदीश म्हात्रे आदींसह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.  कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अध्यक्ष छाया कुऱ्हाडे, संस्थापक अध्यक्ष गिरधर कुऱ्हाडे, सचिव संदीप सावेकर, संदीप चोते व संपूर्ण अंबाबाई प्रतिष्ठान टीमने मेहनत घेतली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार भरत जाधव यांनी मांडले. 





Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.