केडीएमसीच्या फ प्रभागात महाराष्ट्र मालमत्ता विरुपणास प्रतिबंध अधिनियमातंर्गत ५ गुन्हे दाखल
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या निर्देशानुसार शहर विद्रुपीकरणात भर घालणा-या होर्डिग्ज व बॅनर्सवर निष्कासनाची कारवाई नियमित स्वरुपात करण्यात येत आहे. याच अनुषंगाने फ प्रभागाच्या सहा.आयुक्त हेमा मुंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक्षक जयवंत चौधरी यांनी डोंबिवली पूर्वेतील पाथर्ली,गोपालनगर व टिळकनगर परिसरातीलअनाधिकृत होर्डिग्ज, बॅनर्सवर महाराष्ट्र मालमत्ता विरुपणास प्रतिबंध अधिनियमातंर्गत ५ गुन्हे दाखल केले आहेत.
यामध्ये जाहिरातींचे बॅनर्स लावतांना महापालिकेची कुठलीही परवानगी घेतलीबाबतची नोंद दिसून येत नसल्यामुळे टिळक नगर पोलीस स्टेशन ,डोंबिवली येथे महाराष्ट्र मालमत्ता विरुपणास प्रतिबंध अधिनियम १९९५ चे कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

