Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

सातासमुद्रापार दुबई येथे रंगला भव्य आषाढी एकादशी सोहळा

 

सातासमुद्रापार दुबई येथे रंगला भव्य आषाढी एकादशी सोहळा

कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,

कल्याण : सालाबाद प्रमांणे श्री गणेश भजन मंडळ शारजाह यांनी यावर्षी देखील आषाढी एकादशी हा कार्यक्रम आषाढी एकादशीच्या दिवशी दुबई मध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला. या कार्यक्रमाचे मंडळाचे हे दहावे वर्ष होते. मराठी लोकांना एकत्र आणण्याचे व आपली मराठी परंपरा जोपासण्याचे मुख्य कार्य हे मंडळ वर्षानुवर्षे करत आहे. दुबईतील मराठी माणसानांनी ह्या कार्यक्रमाला मोठया संख्येने उपस्थति लावली होती.

मंडळाचे चालक विठोबा अहिरे आणि मंडळाचे सर्व धडाडीच्या  कार्यकर्त्यांमुळे शांतात आणि मंगलमय वातावरणात हा सोहळा यशस्वी रित्या साजरा झाला. कार्यक्रमचे मुख्य आकर्षक म्हणजे दिंडी, नऊवारी साड्या व वारकरी पोशाखात मंडळातील लोकांनी अक्षरशः हा राजस्थान दिंडी नाचवली. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि ज्ञानेश्वरीचे स्मरण व पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. दुबईच्या वाळवंटात अक्षरशः पंढरपूर सारखी वारी रंगली. मान्यवरांचे सत्कार, ज्ञानेश्वरीचे वाटप आणि देवांच्या आरत्यांनी कार्यक्रमाची सांगता झाली.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.