केडीएमसी क्षेत्रातील रस्त्यांचे पुर्नपुष्टीकरण डांबरणीकरण निकृष्ठ
रस्ता दुरावस्था प्रश्नी केडीएमसी प्रशासन कधी जागृत होणार
कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,
कल्याण : कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रातील काही मुख्य रस्त्याची काही महिन्यांपूर्वी केलेल्या पुर्नपुष्टीकरण डांबरणीकरण कामे वादाच्या भोवर्यात सापडली असल्याचे त्यांची पावसाळ्यात झालेली दुरावस्था पाहता दिसून येत आहे. केडीएमसी प्रशासनाकडून काही महिन्यांपूर्वी कल्याणातील मोहिंदर सिंग काबूल सिंग रस्ता, लाल चौकी पोलीस स्टेशन ते पारनाका, गांधी चौक ते अत्रे रंगमंदिर, शंकरराव चौक ते टिळक चौक या रस्त्याचे पुर्नपुष्टीकरण करण्यात आले. यंदाच्या पावसाळ्याच्या सुरूवतीपासून या रस्त्यावर पडलेले खड्डे आणि रस्त्यावर डांबर मातीयुक्त चिखल झाल्याचा खळबळजनक आरोप माजी नगरसेवक मोहन उगले यांनी करीत कामाचा दर्जा कधी सुधारणार की, संदर्भीत ठेकेदारांची बीले काढून चागंभल करणार असा संत्पत सवाल यानिमित्ताने केला आहे.
पावसाळ्यापूर्वी पावसाळ्यानंतर रस्त्यावरचे खड्डे भरण्यासाठी आणि नागरिकांना प्रवास करताना दिलासा मिळण्यासाठी केडीएमसीने सुमारे साडेसात कोटीची कामे विविध एजन्सीला कामाचा ठेका दिला असला तरी ऐन पावसाळ्यात काही ठिकाणी सिमेंट रस्त्यांची विकासकामे सुरु आहेत. नवीन झालेल्या सिमेंट रस्त्याचे काम पाहता पूर्वी पेक्षा यंदा खड्डे भरण्याच्या कामाचा ताण एजन्सीला कमी झाला असल्याचे जाणकरांचे मत आहे. संदर्भीत रस्त्यावर डांबर युक्त चिखल आणि खड्डे पाहता आणि रस्त्यावरून होणारी वाहनांची वर्दळ आणि खड्डे युक्त रस्त्यामुळे वाहन चालकांची वाहने चालविताना होणारी तारेवरची कसरत पाहता आणि रस्त्यावरून ये जा करणार्या करदात्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आह
या खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास त्यास जबाबदार कोण? असा प्रश्न करीत यास जबाबदार असणाऱ्या दोषींवर कारवाई कोण करणार असा सवाल उगले यांनी करीत याबाबत आयुक्त यांना पत्र देऊन देखील रस्ता दुरावस्था प्रश्न मार्गी कधी लागणार, तसेच गुणवत्ता दक्षता विभागाचे कार्यकारी अभियंता यांना देखील रस्ता संदर्भीत रस्ता दुरावस्था पाहणी करण्यास सांगितले होते. या रस्ताचे गुणवत्ता, दर्जायुक्त रस्ते कामाबाबत अमंलबजावणी होणार की, प्रशासकीय राजवटीत हे भिजंत घोगंडे असेच सुरू राहणार असा खडा सवाल देखील उगले यांनी केला आहे.
वडवली ते आंबिवली रेल्वे स्टेशन हा रस्ता वर्षेभरा पूर्वी चांगला बनविला होता. पंरतु पाणी पुरवठा वहिनी टाकणे कामात या रस्त्याचे तीन तेरा नऊ बारा वाजले आहेत. चरीभरी अंतर्गत या रस्त्याचे काम करीत मल्लमपटी केलेल्या या रस्त्यावर पडलेले खड्डे आणि दुरावस्था मुळे अपघाताला आमंत्रण अशी अवस्था या रस्त्याची स्थिती झाली आही. यांची डागडुजी कधी होणार अशी मागणी यानिमित्ताने जोर धरू पाहत आहे.


