‘सहज वार्ता संपादक सिद्धार्थ वाघमारे यांची ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाला भेट
“Waste to Best” उपक्रमाची घेतली माहिती
कलम भूमी कल्याण प्रतिनिधी,
ठाणे, दि. २२ जुलै — ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाच्या टेरेसवर उभारण्यात आलेल्या शासनमान्य “टेरेस गार्डन” या उपक्रमाला आज साप्ताहिक ‘सहजवाती’चे मुख्य संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार सिद्धार्थ वाघमारे यांनी भेट दिली. पर्यावरण रक्षण व सेंद्रिय शेतीच्या दृष्टीने उपयुक्त ठरणाऱ्या या अभिनव उपक्रमाविषयी त्यांनी माहिती घेतली आणि कौतुकही केले.
यावेळी पर्यावरण अभ्यासक विजयकुमार कड्डी यांनी “Waste to Best” या संकल्पनेतून साकारलेल्या टेरेस गार्डनचे सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी वाघमारे यांना झाडांचे संगोपन, जैविक खतांचे महत्त्व, प्लास्टिकचा पुनर्वापर करत तयार केलेले श्रेड टू ट्रेंड प्रकल्प याविषयी माहिती दिली. संपूर्ण टेरेसवर सेंद्रिय पद्धतीने फळझाडे, फुलझाडे व भाजीपाला यांचे उत्पादन घेण्यात येत असून त्याचा उपयोग पर्यावरण संवर्धनाबरोबरच प्रेरणादायी उपक्रम म्हणून केला जात आहे.
भेटीदरम्यान ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, ठाणे जिल्हा सैनिक कल्याण समितीचे नागरी सदस्य दिलीप गुप्ते तसेच जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
वाघमारे यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना म्हटले की, “शासकीय कार्यालयाच्या टेरेसवर पर्यावरणस्नेही गार्डन उभे राहणे ही प्रेरणादायी बाब असून, इतर शासकीय व खासगी संस्थांनीदेखील याचा आदर्श घ्यावा.”
सहजवाती’चे संपादक सिद्धार्थ वाघमारे यांना पर्यावरण अभ्यासक विजयकुमार कड्डी टेरेस गार्डनची माहिती देताना. उपस्थित - जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, दिलीप गुप्ते.
