Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

सिवर - सेप्टिक टँकची स्वच्छता

 

सिवर - सेप्टिक टँकची स्वच्छता करणाऱ्या कामगारांसाठी केडीएमसीतर्फे सुरक्षा प्रशिक्षण कार्यशाळा

कलम भूमी, कल्याण प्रतिनिधी,

कल्याण : सिवर - सेप्टिक टँक सफाईचे काम करताना अनेकदा अपघाताच्या घटना घडण्याचा संभव असतो. या दुर्घटनांना आळा घालण्यासाठी तसेच कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनातर्फे नमस्ते योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचाच एक भाग म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांसाठी आज कामा फाऊंडेशनतर्फे सुरक्षा प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून केंद्र, राज्य आणि महापालिका प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने  सफाई कर्मचाऱ्यांचे प्रबोधन केले जात आहे.कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहात आज संपन्न  झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या  या सुरक्षा प्रशिक्षण कार्यशाळेत  सिवर - सेप्टिक टँक सफाई करताना कर्मचाऱ्यांनी कशाप्रकारे सुरक्षेची काळजी घ्यावी, कोणती उपकरणे वापरावीत, स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी इ. प्रमुख मुद्द्यांवर  कामा फाऊंडेशनच्या तज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या जनि / मनि: विभागाचे कार्यकारी अभियंता घन:श्याम नवांगुळ यांनी दिली आहे.

 तसेच या कार्यशाळेला उपस्थित सफाई कर्मचाऱ्यांची नोंदणी करून त्यांना लागू असणारे शासकीय लाभ उपलब्ध करून देण्यासाठीही कार्यवाही केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत सफाई मित्र व सफाई कामगारांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले होते त्याचा लाभ उपस्थित सफाई कामगारांनी घेतला.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.